नवी मुंबईत ट्रेलरच्या धडकेत
१७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : एपीएमसी मार्केटमधील अन्नपूर्णा चौकात भरधाव ट्रेलरने बुधवारी (ता. २१) सायंकाळी एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत एका १७ वर्षीय तरुणाचा ट्रेलरच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या अपघातात तरुणाचे वडीलही रस्त्यावर फेकले गेले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अजय जग्गू चव्हाण (१७) असे मृत तरुणाचे नाव असून, तो मानखुर्द येथील साठेनगरमध्ये राहत होता. बुधवारी सायंकाळी अजय त्याचे वडील जग्गू सरदार चव्हाण यांच्या सोबत दुचाकीने वाशी येथे आला होता. दोघेही आरेंज सर्कल येथून तुर्भे नाक्याच्या दिशेने जात होते. ते एपीएमसीतील अन्नपूर्णा सिग्नलजवळून जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे जग्गू रस्त्याच्या बाजूला फेकले गेले, तर अजय ट्रेलरच्या मागील चाकाखाली आला. या अपघातात अजय गंभीर जखमी झाला. या वेळी पोलिसांनी अजयला वाशी महापालिका रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
भरधाव अवजड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीचा प्रश्नही यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.