मुंबई

२०० कोटींच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून फार्मा कंपनीला ४० लाखांचा गंडा! फसवणूक करणाऱ्या दुक्कलीचा वाशी पोलिसांकडून शोध सुरू

CD

फार्मा कंपनीची ४० लाखांची फसवणूक

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २०० कोटींची गुंतवणूक करण्याचे प्रलोभन दाखवून एका फार्मा कंपनीची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नामांकित कंपनीचे फायनान्शिअल कन्सल्टंट असल्याचे भासवून भामट्यांनी सल्लागार शुल्क आणि प्रोजेक्ट रिपोर्टच्या नावाखाली ही रक्कम उकळली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी पूजा उमक आणि चिराग या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अश्वनी कुमार सिंग हे उत्तराखंडमधील रुडकी येथे राहण्यास असून, ते एम्बेलिश फार्माटेक प्रा. लि. या कंपनीत व्हॉइस चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. १४ मे रोजी ते कामानिमित्त वाशी येथे आले असताना पूजा उमक हिने त्यांच्याशी संपर्क साधला होता. आपण फ्ल्युइडमास्टर इंडिया प्रा. लि. या कंपनीची फायनान्शिअल कन्सल्टंट असल्याचे सांगत तिने त्यांच्या कंपनीत २०० कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पूजा उमक हिने हरिद्वार येथील कंपनीला भेट देऊन पाहणी करण्यासाठी अश्वनी कुमार यांच्याकडून विमानाचे तिकीट घेतले. त्यानंतर तिने सल्लागार शुल्क, प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये बदल आणि अन्य व्यावसायिक प्रक्रियांच्या नावाखाली वेळोवेळी पैशांची मागणी केली. दिल्ली येथे गेल्यानंतर पूजा उमक हिने अश्वनी कुमार यांची चिराग नावाच्या व्यक्तीशी भेट घालून दिली. तसेच कंपनीचे चेअरमन परदेशात राहत असून, भारतातील कामकाज चिराग पाहत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर पूजा व चिराग यांनी मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन देत अश्विनी कुमार यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये एकूण ४० लाख २० हजार रुपये हस्तांतरित करून घेतले. एवढे पैसे दिल्यानंतरही गुंतवणुकीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अश्विनी कुमार यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi reply to Delhi traders : "मोदींना सांगा 'आरोपी नंबर ४' ला हटवा, ३० सेकंदांत आंदोलन थांबवतो!"; १० हजार कोटींच्या नुकसानीच्या पत्रावर राहुल गांधींची थेट अट

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Blinkit Fake customer care fraud : फुटलेल्या दह्याचे पैसे परत मागणे पडले महागात! व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून 'GPay' उघडताच अवघ्या ६० सेकंदांत बँक खाते रिकामे

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

SCROLL FOR NEXT