मुंबई

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडित मुलगी १० आठवड्यांची गर्भवती

CD

लग्नाच्या भूलथापा दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : रबाळे परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे पीडित मुलगी १० आठवड्यांची गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी नराधम तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी व पीडित मुलगी ही दोघेही रबाळे परिसरात राहण्यास आहेत. हे दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. या दरम्यान तरुणाने पीडित मुलीला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत पीडितेवर राहत्या घरात दोन वेळा लैंगिक अत्याचार केले. काही दिवसापूर्वी पीडित गर्भवती असल्याचे तिला लक्षात आले. त्यानंतर तिने आपल्या पालकांना त्याबाबतची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितेने रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तरुणाला अटक करुन पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Army: आंदोलनकर्त्यांवर थेट बॉम्ब फेकले! पाककडून आपल्याच जनतेवर भीषण हल्ला; सात जणांचा मृत्यू

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Latest Marathi News Live Update : घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT