तुर्भेमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी
सात ते आठ जणांच्या टोळीची पाच तरुण-तरुणींना मारहाण
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : तुर्भे एमआयडीसी परिसरातील ‘मित्रो लाउंज बार’मध्ये डान्स करताना एकमेकांना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. या वेळी सात ते आठ जणांच्या टोळक्याने पाच तरुण-तरुणींना मारहाण केली. या वेळी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या घटनेनंतर तुर्भे पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरण येथे राहणारा राज दौलत घरत (वय २५) सोमवारी रात्री आपल्या मित्र-मैत्रिणींसह तुर्भे एमआयडीसीतील मित्रो लाउंज बारमध्ये गेला होता. बारमध्ये डान्स करत असताना राज घरत आणि आरोपींच्या गटातील विकी गुप्ता याला धक्का लागला. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पहाटे सव्वापाचच्या सुमारास बारच्या पार्किंग परिसरात त्याच वादातून त्यांच्यात पुन्हा भांडण होऊन हाणामारी झाली. या वेळी आरोपी विकी गुप्ता याने धारदार शस्त्राने राज घरत याच्या डोक्यावर, डाव्या कानाजवळ आणि उजव्या डोळ्याजवळ वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला, तर यश देशमुख याने राज याचा मेहुणा मयूर भगत याला मारहाण केली. याशिवाय अंकुश केशरवाणी आणि त्याच्यासोबत असलेल्या चार ते पाच जणांनी नितेश पाटील, यश पाटील आणि त्यांच्या सोबत असलेल्या तरुणीलाही शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत राज घरत आणि मयूर भगत हे दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तुर्भे पोलिसांनी विकी गुप्ता, यश देशमुख, अंकुश केशरवाणी आणि त्याच्यासोबत असलेल्या चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.