ट्रिपल सीट बुलेटची कंटेनरला भीषण धडक
२१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोन मित्र जखमी
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : ट्रिपल सीट भरधाव दुचाकीची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये २१ वर्षीय दुचाकीचालकाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी (ता. १०) ठाणे-बेलापूर महामार्गावर कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव शबरी नायर असे असून, जखमी झालेल्यामध्ये कनिष्क वैती आणि ओम किशोर गावंडया दोघांचा समावेश आहे. हे तिघे मित्र घणसोली गाव येथे राहात होते. शबरी नायर याने मित्राकडून दुचाकी घेतली होती. त्यानंतर तिघे मित्र रात्री बेलापूर येथील दिवाळा येथे फिरण्यासाठी गेले होते. यानंतर घरी परतताना दुचाकी ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ आली असता, शबरी याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनरवर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की, शबरीचा जागीच मृत्यू झाला. तर, कनिष्क आणि ओम यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, तुर्भे पोलिसांनी शबरी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.