मुंबई

एसटी बससमोर दुचाकी आडवी घालून चालकाला बेदम मारहाण; उरणमध्ये जोडफ्याचा भररस्त्यात धुडगूस;

CD

एसटी बसचालक, वाहकाला मारहाण

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : चारफाटा बस थांब्यावर बस का थांबवली, असा जाब विचारत एका जोडप्याने एसटी बसचालक आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना उरणमध्ये शुक्रवारी (ता. १३) घडली. ओएनजीसी कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोर घडलेल्या या घटनेवेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या वाहकालाही त्यांनी मारहाण केली. पोलिसांनी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू केला आहे.

उरण एसटी आगारातील चालक भारत गायकवाड (५५) शुक्रवारी सकाळी उरण ते आवरे-चिरनेर मार्गावर बस घेऊन निघाले. त्यांच्यासोबत वाहक अनंत वाघमारेदेखील होते. सकाळी ११च्या सुमारास ओएनजीसी कॉलनीच्या गेटसमोर बस आली असता, काळ्या रंगाच्या हिरो स्फ्लेंडर फ्लस मोटारसायकलवरील जोडप्याने अचानक बससमोर दुचाकी आडवी लावून बस अडवली. त्यानंतर दुचाकीस्वाराने बसच्या केबिनमध्ये जाऊन गायकवाड यांना चारफाटा येथे बस थांबवल्याबाबत जाब विचारला आणि अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांना मारहाण केली. त्याचवेळी सोबत असलेल्या महिलेनेही मारण्यास सुरुवात केली. या प्रकरणात वाहक अनंत वाघमारे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता या जोडप्याने त्यांनाही मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच उरण एसटी आगाराचे व्यवस्थापक आणि वाहतूक निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Orleans Ship Crash : मिसिसिपी नदीत क्रूझ बोटीला महाकाय टँकरची भीषण धडक! अवघ्या १५ मिनिटांत बोट उलटली; १२९ प्रवाशांचे पुढे काय झाले?

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT