शैलेंद्र द्विवेदीवर फसवणुकीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला बनावट पत्रकार शैलेंद्र द्विवेदी याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. त्याने एका २५ वर्षीय तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. अखेर आरोपीला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे समजताच, पीडितेने धाडस दाखवत सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला ३० मे २०२५ रोजी सीबीडी सेक्टर-१५ मधील आरुष हॉटेलमध्ये आयोजित वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. या पार्टीत शैलेंद्र द्विवेदीदेखील उपस्थित होता. त्याने संधी साधून पीडितेच्या शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले. हे पेय पिल्यानंतर पीडितेला चक्कर आली. ही संधी साधून आरोपीने तिला आरुष लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची तसेच तिच्या कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिली. तसेच पीडित तरुणीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेला खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यामुळे भीतीपोटी पीडितेने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती.
दरम्यान, आरोपी शैलेंद्र द्विवेदी याने ठाण्यातील व्यापारी विजय झा यांच्यासह अन्य चार जणांची फ्लॅटविक्रीच्या व्यवहारात तब्बल १९ लाखांची फसवणूक केल्याने उलवे पोलिसांनी त्याला १२ नोव्हेंबर रोजी फसवणुकीच्या गुह्यात अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली आहे. या गुह्यापाठोपाठ शैलेंद्र द्विवेदी याच्या विरोधात एका २५ वर्षीय तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.