मुंबई

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; अंधश्रद्धेतून ११ लाखांची फसवणूक

CD

फोटो : भोंदू बर्डे बाबा H29267
....
दहा पट पैशांचे प्रलोभन;
११ लाखांची फसवणूक

नाशिकच्या भोंदू बर्डेबाबाला अटक

नाशिक, ता. १० : पैशांचा १० पट परतावा आणि अघोरी पूजेद्वारे ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुंबई महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याची सुमारे ११ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपळे खुर्द (ता. कळवण) येथील तथाकथित भोंदूबाबा हिराचंद शिवाजी बर्डे ऊर्फ राजूबाबाला अभोणा पोलिसांनी अटक केली. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बर्डेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार राजाराम शेलार (वय ६५, रा. बोरिवली) हे मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची एका सहकाऱ्यामार्फत भोंदूबाबाशी ओळख झाली. बाबाने शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांना सुरुवातीला एक हजार रुपयाचे दोन लाख करून दाखवण्याचे नाटक केले. त्यानंतर पाच लाख रुपये दिल्यास १५ कोटींचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवले. त्यास बळी पडत शेलार यांनी तब्बल चार लाख २० हजार रुपये रोख आणि उर्वरित रक्कम ऑनलाइन माध्यमातून भोंदूबाबाच्या खात्यावर जमा केली. पूजेच्या वेळी काळोख असलेल्या खोलीत नारळाचा स्फोट घडवून आणत पैशांचा पाऊस पडल्याचा भास निर्माण केला.
--
‘गोणीत’ निघाल्या खेळण्यातील नोटा
पूजेनंतर बाबाने एक पैशाने भरलेली गोणी शेलार यांच्याकडे स्वाधीन केली. ‘सात दिवस ही गोणी उघडू नका, नाहीतर देवाचा कोप होईल,’ अशी भीती घातली. दरम्यान, तक्रारादाराच्या नातलगाचे निधन झाल्याचे भोंदूला सांगितले. त्याने गोणी परत घेऊन स्मशानात पूजाविधी करण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली. या वेळी संशय आल्याने त्यांनी गोणी उघडली असता, केवळ वर आणि खाली खरी नोट आतमध्ये मात्र खेळण्यातील नोटा आढळल्या.
---
धमकी दिल्याने भांडाफोड
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पैसे परत मागितल्यावर ‘अघोरी विद्येने गायब करीन’, अशी धमकी दिली. अखेर तक्रारदार शेलार यांच्या तक्रारीवरून हिराचंद शिवाजी बर्डे, रामचंद्र बर्डे, विशाल पवार, सुमित्रा बर्डे, रवींद्र पवार, सोमनाथ बारामते आणि चिंतामण चौरे यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा व फसवणुकीचा गुन्हा अभोणा पोलिसात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT