मुंबई

नाशिकमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

CD

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के

नाशिक (ता. सुरगाणा), ता. ९ : तालुक्यातील पश्चिम भागात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी ७.४८ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सलग दोन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे पाच ते सात सेकंद जमिनीला कंप जाणवल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर रस्त्यावर आले.
मांधा, गुही, रघतविहर, फणसपाडा, सुभाषनगर, जामुनपाडा, कोठुळा, पांगारणे, चापावाडी, हनुमानपाडा, झारणीपाडा, पिंपळसोंड, उंबरपाडा, तातापाणी या गावांसह लगतच्या गुजरात राज्यातील बोपी, चासमांडव, जहागिरी, निरपन, बिलदा, तनशा या भागातही हे धक्के जाणवले. हादऱ्यामुळे काही घरांतील भांडी खाली पडली, तर कौले व पत्र्यांची हालचाल झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. तहसीलदार रामजी राठोड यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले, की भूकंपाचे धक्के जाणवल्यास घाबरून न जाता तत्काळ घराबाहेर मोकळ्या जागेत थांबावे. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना हातात विजेरी घेऊन बाहेर पडावे व विजेच्या तारा किंवा खांब कोसळलेले नाहीत, याची खात्री करावी. या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, संबंधित गावांना भेट देऊन नागरिकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच भूकंपप्रवण गावांची पाहणी करून सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT