मुंबई

मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट्रा झकास’

CD

पुणे, ता. २१ ः मनोरंजन विश्वात १९८२ पासून अग्रगण्य असलेल्या ‘अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट’तर्फे आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट्रा झकास’ लाँच करण्यात आला आहे. या नव्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्जेदार आणि उत्तम नवे चित्रपट, टीव्ही शो, वेबसीरिज, पाककला, लहान मुलांचे माहितीपट आणि इतर व्हिडीओ असा खजिना उपलब्ध होईल. तसेच ‘गाव आले गोत्यात, १५ लाख खात्यात’ आणि ‘रौद्र’च्या मराठी चित्रपटांचे खास प्रीमियर होणार आहेत.
याबाबत ‘अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट’चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, आमच्या नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट्रा झकास’वर प्रेक्षकांना उच्च- गुणवत्तेचा मनोरंजनात्मक कंटेंट उपलब्ध होणार आहे. या प्लॅटफॉर्मवर ॲक्शन, ड्रामा, कॉमेडी, रोमान्स आणि आदी विविध प्रकार कंटेंट असेल. हा प्लॅटफॉर्म स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्हीसहित सर्व प्रमुख उपकरणांवर आहे.
‘अल्ट्रा झकास’चे बिझनेस प्रमुख वेंकट गारापाटी यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर मराठी प्रेक्षकांसाठी विविध हॉलीवूड चित्रपटसुद्धा मराठी भाषेत डब करण्यात आले आहेत. अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंटच्या डिजिटल मार्केटिंगच्या प्रमुख ब्रिंदा अग्रवाल म्हणाल्या की, या प्लॅटफॉर्मवर ब्लॉकबस्टर चित्रपटांपासून, प्रख्यात टीव्ही शो आणि माहितीपटांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी बरंच काही आहे. ‘अल्ट्रा झकास’ ॲप प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना एका लॉगिनवर पाच अकाउंट तयार करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT