मुंबई

अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार नाही

CD

पुणे, ता. १० : बारामती विधानसभा मतदारसंघातून फक्त अजित पवार हेच निवडून येऊ शकतात. दुसरे कोणीही नाही. तसेच मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार नाही असे रोहित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘भाजपने शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे. दुसऱ्यांची घरे फोडून भाजप नेते गंमत बघत असले तरी त्यांचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला पटलेले नाही. शरद पवार यांच्याबरोबर चाळीस वर्षे राहूनही मंत्री दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार कळले नाहीत. त्यांच्या वयाचा मान ठेवत काही गोष्टी बोलणार नाही. केवळ सत्तेसाठी या नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. पण त्यांनी पूर्वी भाजपवर टीका केली होती आता ते काय भूमिका घेणार? असा प्रश्‍नही पवार यांनी केला. बारामतीच्या खासदार सुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या यांच्याविरोधात पार्थ पवार याला उभे करण्याचा निर्णय अजित पवार घेणार नाहीत. या मतदारसंघात कोणीही उभे राहिले, कोणीही विरोधात प्रचार केला तरी सुप्रिया सुळेच खासदार होणार, असेही रोहित पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

Latest Marathi News Live Update : पुण्याला अवकाळीचा तडाखा, ३ तासात १४ ठिकाणी पडली झाडे

SCROLL FOR NEXT