मुंबई

व्यावसायिक मिलेट्स प्रक्रिया कार्यशाळा

CD

व्यावसायिक मिलेट्स प्रक्रिया कार्यशाळा
आहार व आरोग्यविषयक जागरूकता वाढल्याने भरडधान्ये (मिलेट्स) आता ताटात दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर भरडधान्यांवर प्रक्रिया करून विविध नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १४ व १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत मिलेट्स म्हणजे काय, महत्त्व, उपयुक्तता, गरज व मागणी, पोषक गुणधर्म याबाबत माहिती दिली जाणार आहे. पराठा, उपमा, लापशी, खीर, पीठ, लाडू, नमकीन, पुलाव, इडली, डोसा, कुकीज, ढोकळा, स्वीट व बर्फी, प्रोटीन पावडर, चिवडा इत्यादी मिलेट्सचे विविध पदार्थ शिकवण्यात येतील. पॅकिंग, ब्रॅण्डिंग, लागणारी मशिनरी, प्रकल्प, उत्पादन व बाजार खर्च, विक्रीच्या पद्धती आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
....................
मेडिकल कोडिंग प्रमाणपत्र प्रशिक्षण
वैद्यकीय क्षेत्रातील करिअरसाठी मेडिकल कोडिंग हा तीन महिन्यांचा प्रमाणपत्र प्रशिक्षण कोर्स ‘एसआयआयएलसी’ व टेक महिंद्रा यांच्या वतीने १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये सीपीसी (सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर) प्रमाणपत्र तयारीचे मार्गदर्शन तसेच ‘केपीओ’ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) व ‘बीपीओ’साठीचे (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) मार्गदर्शन होणार आहे. मेडिकल शब्दावलीची ओळख, मेडिकल सेवा भाषेची समज, शरीर विज्ञान आणि शारीरिक रचना, कोडिंग प्रणाली : आयसीडी-१०, सीपीटी आणि एचसीपीसीएस कोडिंग, वैद्यकीय सेवा नियमावली (एचआयपीएए), कोडिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे, कोडिंग सराव आदींचा समावेश आहे. सायन्स विषयातील २१ ते २५ वयोगटातील पदवीधारक, व्यावसायिक, मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे प्रवेशास पात्र आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
.................
नगररचना, मूल्यनिर्धारण भरतीपूर्व तयारी प्रशिक्षण
कनिष्ठ आरेखक, अनुरेखक या पदांच्या भरतीसाठीच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. परीक्षेची पूर्वतयारी, तांत्रिक अभ्यासक्रम याबाबत मार्गदर्शन करणारे हे १५ दिवसांचे प्रशिक्षण असणार आहे. एमआयडीसी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, म्हाडा, भूमिअभिलेख अशा विविध विभागांमध्ये स्थापत्य अभियंता सहाय्यक, बांधकाम पर्यवेक्षक, सर्वेअर, अनुरेखक, आरेखक इत्यादी पदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. विविध कन्स्ट्रक्शन सुपरवायझरच्या तसेच ड्राफ्ट्समन सिव्हिल व मेसन आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील हे प्रशिक्षण गरजेचे आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
.................
बांधकाम व्यवसाय पर्यवेक्षक प्रशिक्षण
वेगाने वाढणाऱ्या बांधकाम क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. योग्य कौशल्यांनी सज्ज अशा उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी असणारे असे हे क्षेत्र आहे. स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते, अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर २० दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण २१ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर त्याचा सराव, क्षेत्रभेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९७५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT