मुंबई

स्कूलबसमध्येच दोन मुलींवर अत्याचार

CD

पुणे, ता. ३ : वानवडी परिसरात एका स्कूल बसचालकाने सहा वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर बसमध्ये अत्याचार केल्याची घटना घडली आहे. कोरेगाव पार्कमधील एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी स्कूल बसचालकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (ता. ८) पोलिस कोठडी सुनावली आहे.
संजय जेटिंग रेड्डी (वय ४५, रा. वैदवाडी, हडपसर) असे बसचालकाचे नाव आहे. हा प्रकार ३० सप्टेंबरला घडला. याप्रकरणी एका मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५ (२) सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या सहा वर्षीय मुलीने तिला त्रास होत असल्याचे सांगितले. तेव्हा मुलीला विश्‍वासात घेत विचारले. त्यावर मुलीने स्कूल बसचालक संजय अंकलने शाळा सुटल्यानंतर बसमधून घरी येताना तिच्याशी अश्‍लील कृत्य केले. चार दिवसांपासून माझ्यासह मैत्रिणीशीही असेच कृत्य केल्याचे सांगितले. त्यानंतर आईने दुसऱ्या दिवशी मुलीला स्कूल बसमधून शाळेत पाठविले नाही. मुलीच्या वडिलांनी तिला शाळेत सोडले. तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. तिच्या आईनेही खात्री केली. तेव्हा त्या मुलीसमवेतही असाच प्रकार घडल्याचे लक्षात आले. त्यानंतर पालकांनी बुधवारी (ता. २) सायंकाळी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, बसचालकाला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

मुलींची सुरक्षितता ऐरणीवर :
वानवडीतील घटनेमुळे पुन्हा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापनाकडून स्कूल बसचालकांची चारित्र्य पडताळणी केली जाते का? शिक्षण विभागाकडून त्याबाबत काय खबरदारी घेतली जात आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

‘‘शाळेतील मुलींवर अत्याचार केल्याची बाब निंदनीय आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाने एप्रिलमध्ये स्कूल बसबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिली होती. शाळा व्यवस्थापनाने त्याचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. शाळा व्यवस्थापनाने बसचालकाची चारित्र्य पडताळणी केली नसेल किंवा बसमध्ये महिला वाहक नसल्यास शाळेवरही गुन्हा दाखल करण्यात येईल. शेवटी मुला-मुलींची सुरक्षा महत्त्वाची आहे. जोपर्यंत मुले-मुली गणवेशात आहेत, तोपर्यंत सुरक्षेची जबाबदारी शाळेची आहे.’’
- ॲड. सुशीबेन शाह, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT