मुंबई

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला

CD

व्यावसायिक हायड्रोपोनिक भाजीपाला
पुणे, ता. ३१ : व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इ.विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ व १४ सप्टेंबरला आयोजिली आहे. यात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्यूशन कसे तयार करावे, प्रकाश, आर्द्रता, तापमानाचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबरपासून सहा दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात एक्झीम धोरण, इन्कोटर्मस्, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.
संपर्क : ८४८४८११५४४

अन्नसेवा उद्योग कार्यशाळा
अन्नसेवा उद्योगातील उद्योजक, हॉटेल/रेस्टॉरंट मालक आणि नवउद्योजकांसाठी एक विशेष एकदिवसीय कार्यशाळा १४ सप्टेंबरला आयोजिली आहे. यामध्ये हॉटेल, कॅफे, क्लाऊड किचन व ढाबा व्यवसायाचे नियोजन, ब्रँडिंग, स्थान धोरण, कर्मचारी धोरण, किचन व फ्लोअर व्यवस्थापन, विपणन व ग्राहक व्यवहारांविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. पारंपरिक व आधुनिक व्यवसायातील बदल, तंत्रज्ञानाचा वापर, खर्चाचे नियोजन व शाश्वत व्यवसाय प्रारूप तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच हॉटेल/रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करताना आवश्यक २१ महत्त्वाचे टप्पे, क्लाऊड किचन, स्विगी व झोमॅटोची कार्यप्रणाली, कमिशन व नफावाढीचे तंत्र, फूड स्टॉल्स, ढाबा व कॅफे आदींद्वारे स्थानिक स्तरावर प्रभावी व्यवसाय कसा उभारायचा, स्टाफिंग, किचन लेआउट, पीओएस प्रणाली, इन्व्हेंटरी व फायनान्स नियोजन, फ्रँचायझी मॉडेल आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे. फूड इंडस्ट्रीत स्वतःचा ठसा उमटवू इच्छिणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT