मुंबई

एसआयआयएलसी

CD

व्यावसायिक मसाले कार्यशाळा
पुणे, ता. ८ : घरगुती चवीचे झणझणीत कोल्हापूर स्टाईल मसाले प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा १३ व १४ सप्टेंबरला होणार आहे. यात सुमारे १० प्रकारचे मसाले प्रत्यक्ष तयार करून शिकविले जातील. त्याच्या नोट्स पुरवल्या जातील. यात पहिल्या दिवशी बिर्याणी, चिकन, मटण, चाट, किचन किंग, मालवणी कोकणी, काळा, कोल्हापुरी कांदा लसूण, मिसळ, गोडा, पेरी पेरी, गरम इत्यादी मासाले प्रात्यक्षिकांसह शिकवले जातील. दुसऱ्या दिवशी मसाला व्यवसाय उभे करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, मसाला व्यवसायाला असणारी मागणी व त्याचे स्वरूप, उपलब्ध असणारी बाजारपेठ, मार्केटिंग करण्याच्या पद्धती, मसाला व्यवसायासाठी लागणारी जागा, प्रोजेक्ट रिपोर्ट, लागणाऱ्या मशिनरी, कॉस्टिंग आदींविषयी माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४

व्लॉगिंग (लाइफस्टाइल/ट्रॅव्हल/फूड) कार्यशाळा
सोशल मीडियाच्या जगात फॉलोअर्सशी कनेक्ट होण्यासाठी व्हिडिओ सामग्री ऑनलाइन तयार करणे आणि शेअर करणे म्हणजेच व्लॉगिंग करणे लोकप्रिय माध्यम ठरत आहे. लाइफस्टाइल, ट्रॅव्हल, फूड या प्रकारातील व्लॉग पैसे कमावण्याचे माध्यमही आहेत. ज्यांना या प्रकारामध्ये रस आहे व स्वतःची सर्जनशीलता व्लॉगच्या माध्यमातून पुढे आणायची आहे, अशांसाठी याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १४ सप्टेंबरला होणार आहे. कार्यशाळेत यूट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मची मूलभूत माहिती, व्लॉग शूट करण्याचा निर्णय कसा घ्यावा (पूर्वनिर्मिती), व्लॉग कसा शूट करायचा (उपकरणे, कॅमेरा वर्क) व्लॉग एडिटिंग, थम्बनेल, टायटल, साउंड, ग्राफिक्स कसे ॲड करायचे, व्लॉग कसा पॅकेज करायचा, व्लॉगिंग क्षेत्रात भविष्यातील संधी आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळेदरम्यान प्रत्यक्ष नमुना व्हिडिओ शूट करून त्यावर चर्चा व शंकानिरसन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण
आजच्या डिजिटल युगात बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक झाली आहे. अशा वेळी बीपीएमएस पोर्टल व पीआरईडीसीआर प्रणाली समजून घेणे हे वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते व नगर नियोजकांसाठी अत्यावश्यक झाले आहे. १५ जुलै ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणारे बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण हे व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे. केवळ एका महिन्यात यूडीसीपीआर नियोजन नियम, बिल्डिंग परमिशन प्रक्रिया, योग्य ड्रॉइंग सबमिशनसाठी स्किल्स आणि पीआरईडीसीआर टेस्टिंग यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यांसाठी व्हॉट्सॲप सहाय्य, रेकॉर्ड केलेल्या सत्रांना आजीवन प्रवेश, टीपी क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.
संपर्क : ८४८४८११५४४

एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT