मुंबई

ड्रोन बनविणे आणि उडविण्याचे विशेष कार्यशाळा

CD

ड्रोन बनविणे, उडविण्याची विशेष कार्यशाळा
पुणे, ता. २६ : विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कल्पकतेला चालना मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’च्या कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे ड्रोन बनविणे आणि उडविण्याची दोन दिवसांची आगळीवेगळी कार्यशाळा १० आणि ११ मे रोजी आयोजित केली आहे.
कार्यशाळेत सात ते १६ वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० ड्रोन तंत्रज्ञानाची ओळख होईल. तसेच ते स्वतःचा ड्रोन बनविण्याचा आणि उडविण्याचा अनुभव व आनंद घेऊ शकतील. २१व्या शतकातील अत्यावश्यक कौशल्ये, सर्जनशीलता, टेक्नॉलॉजीची समज आणि समस्या सोडविण्याची कलाही त्यांना अवगत होईल. विद्यार्थ्यांना पूर्व अनुभवाची गरज नाही. केवळ उत्सुकता आणि थोडी कल्पकता पुरेशी आहे. जागा मर्यादित असल्याने आगाऊ नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४ किंवा क्यूआर कोड स्कॅन करावा.

काय शिकणार?
- ड्रोनचा वापर कुठे व कसा होतो?
- ड्रोनचे भाग व रचना ओळख
- ड्रोन किट तयार करणे
- स्वतःचा ड्रोन बनविणे
- सिम्युलेशन, ड्रोन पायलट ट्रेनिंग
- खऱ्या ड्रोनसह उड्डाणाचा अनुभव

कधी, कुठे, केव्हा?
कधी : शनिवार (ता. १० मे) व रविवार (ता. ११ मे)
कुठे : सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, बाणेर रस्ता, पुणे.
केव्हा : सकाळी ११ ते दुपारी ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT