मुंबई

स्वयंपुनर्विकासाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

CD

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वयंपुनर्विकास ही संकल्पना वेगाने पुढे येत असून, त्याबाबत सविस्तर माहिती देणारी विशेष कार्यशाळा ४ जानेवारीला आयोजिली आहे. स्वयंपुनर्विकास म्हणजे सोसायटीने स्वतः पुढाकार घेऊन विकसक न नेमता पुनर्विकास करणे. या पद्धतीमुळे जुन्या सदनिकाधारकांना भाडे, कॉर्पस फंड, बेटरमेंट चार्जेस तसेच इतर खर्चाचा अधिक फायदा मिळू शकतो. कार्यशाळेत स्वयंपुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, सोसायटीचे ठराव, शासकीय नियम तसेच आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनिअर, कंत्राटदार व इतर सल्लागारांशी समन्वय कसा साधायचा, प्रकल्प सल्लागार कसा निवडावा, ठेकेदाराची निवड, दर्जेदार व वेळेत बांधकाम कसे सुनिश्चित करावे, याचीही माहिती दिली जाईल. कार्यशाळेला मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ हे ३७ वर्षांचा अनुभव असलेले सिव्हिल इंजिनिअर व विकसक असून, त्यांनी अनेक पुनर्विकास प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. इच्छुक सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासासाठी खात्रीशीर प्रकल्प सल्लागार सेवा (सशुल्क) उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सरकारी बाजारपेठ (जीईएम पोर्टल) प्रशिक्षण
सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करीत आलेल्या विविध वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी एक ई-बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. या पोर्टलवर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था यांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तू यांची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारातील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी आरंभापासून अखेरपर्यंत ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबतच मार्गदर्शन करणारे ऑनलाइन दोन आठवडे चालणारे प्रशिक्षण ५ जानेवारीपासून आयोजिले आहे. व्यवसाय वाढीसाठी हे उपयुक्त प्रशिक्षण आहे.

प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफर
प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफर हा एक विशेष प्रकार आहे. सध्या कॅमेऱ्यातूनही प्रॉडक्ट्सचे वेगळेपण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून अधिक उठावदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहचते. याबाबत मार्गदर्शन करणारे दोन दिवसांचे प्रशिक्षण १० व ११ जानेवारी रोजीला आयोजिले आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचे प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. क्लासरूम प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व एडिटिंग प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती मिळेल. हे प्रशिक्षण नवीन लोकांसाठी तसेच इतर कोणत्याही व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायाला प्रोफेशनल लूक देण्यासाठी, ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT