मुंबई

डिजिटल चित्रपट निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळा

CD

डिजिटल चित्रपट निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळा
पुणे, ता. २४ : डिजिटल चित्रपट निर्मिती हे झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या प्रभावामुळे या क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. अनेकांना स्वतः चित्रपट निर्मिती करावी असे वाटते. मात्र तांत्रिक बाबींची माहिती नसते. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील अनेक प्रकारच्या संधींविषयी माहिती देणारा तसेच सर्व प्रकारांच्या डिजिटल चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक कौशल्यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणारा तीन महिन्यांचा विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम दर शनिवार-रविवारी ‘एसआयआयएलसी’ने आयोजिला आहे.
या अभ्यासक्रमात ८० टक्क्यांपेक्षा जास्त अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर आधारित असून प्रशिक्षणार्थींकडून लघुपट निर्मिती केली जाणार आहे. चित्रीकरणाचे तंत्रज्ञान, संकलन, व्हीएफएक्स इफेक्ट, संकल्पना, कथालेखन, पटकथा निर्मिती आणि चित्रपट दिग्दर्शन इ. अनेक घटकांवर चित्रपटसृष्टी तसेच दूरचित्रवाणी क्षेत्रातील २५ हून जास्त वर्षांचा अनुभव असलेले दिग्दर्शक शिवाजी कचरे हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्यक्ष चित्रीकरण स्थळाला भेटीचे आयोजन आहे. आगाऊ नोंदणी आवश्‍यक.
नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८२२१६६ किंवा ९८८१०९९७५७
......................


प्रशिक्षणाविषयी....
- चित्रपट लेखन, वेबसीरिज, शॉर्ट फिल्म्स, व्लॉग्स इ.साठी कथा, पटकथा लेखन
- व्हिडिओ एडिटिंग, फायनल कट प्रो, एडॉब प्रीमियर, दाविन्सी रिसॉल्व्हसारखे टूल्स वापरणाऱ्यांना मागणी
- डिजिटल कॅमेऱ्यांचा वापर करून कमी बजेटमध्ये उच्च दर्जाचा कंटेंट तयार करणे
- टु डी, थ्री डी अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, मोशन ग्राफिक्सद्वारे संधी
- डिजिटल मार्केटिंग : चित्रपट वा वेबसीरिज प्रमोशनसाठी सोशल मीडिया मॅनेजर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स
- निर्मिती व्यवस्थापन, लोकेशन मॅनेजमेंट, बजेटिंग, शेड्यूलिंगसाठी संधी
- नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, झी-५, प्लॅनेट मराठी, यू-ट्युबसारख्या प्लॅटफॉर्मवर स्वतःची निर्मिती करणे
- स्वतः मोबाईल, डीएसएलआर वापरून कमी बजेटमध्ये शॉर्ट फिल्म्स बनविणे
- या फिल्म यू-ट्युब किंवा चित्रपट महोत्सवामध्ये पाठवण्याची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT