मुंबई

रब्बी पीक नियोजन ऑनलाइन कार्यशाळा

CD

रब्बी पीक नियोजन ऑनलाइन कार्यशाळा
शेतकरी बांधवांसाठी ‘राजमा, हरभरा आणि मसूर लागवड’ या विषयावर रब्बी पीक नियोजनावरील विशेष ऑनलाइन कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी योग्य पिकांची निवड, लागवड नियोजन आणि उत्पादनवाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक रब्बी हंगामासाठी जमिनीची तयारी, खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय, तसेच उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक आधुनिक शेती तंत्र समजावून सांगतील. यासोबतच सरकारी योजनांचा लाभ आणि उपलब्ध सल्ला सेवांविषयीही माहिती देण्यात येईल. कार्यशाळा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नियोजन अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्यास आणि उत्पादनक्षमता वाढवण्यास मदत करेल.

ई-कॉमर्समधील ड्रॉप शिपिंग बिझनेस मॉडेल
ई-कॉमर्समध्ये यशस्वी करिअर घडवायचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी खास आयोजिलेली ड्रॉपशिपिंग बिझनेस मॉडेल ही ऑनलाइन कार्यशाळा १५ नोव्हेंबरपासून आयोजिली आहे. ड्रॉप शिपिंग ही अशी पद्धत आहे जिथे कोणतीही इन्व्हेंटरी किंवा गोदामाची गरज न पडता तुम्ही ऑनलाइन स्टोअर चालवू शकता. फक्त योग्य उत्पादने, विश्वासार्ह पुरवठादार आणि परिणामकारक मार्केटिंगच्या साहाय्याने तुम्ही स्वतःचा व्यवसाय काही तासांत सुरू करू शकता. कार्यशाळेत तुम्हाला शून्य इन्व्हेंटरीतून स्वतःचा स्टोअर तयार करून प्रत्यक्ष व्यवसाय कसा सुरू करावा हे शिकवले जाईल. यामध्ये ड्रॉप शिपिंगचे सैद्धांतिक ज्ञान, वेबसाइट डेव्हलपमेंटचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि समाज माध्यमांवर मार्केटिंग जाहिराती कशा तयार करायच्या याचं मार्गदर्शन होणार आहे.

इन्स्टंट ग्रेव्ही व मिक्सेस कार्यशाळा
धावपळीच्या जीवनशैलीमुळे झटपट, स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्नाची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेडी टू कुक अन्न उद्योगामध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या संदर्भात मार्गदर्शन करणारी व्यावसायिक कार्यशाळा १६ नोव्हेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत इन्स्टंट डोसा, इडली, वडा, ढोकळा, पोहे, उपमा, शिरा, पुलाव, दाल खिचडी, फालुदा, खीर, रबडी, आइस्क्रीम मिक्स, गुलाबजामून, पकोडा, तसेच मल्टीग्रेन पराठा, थालीपीठ भाजणी, उपवास भाजणी यासारखे विविध इन्स्टंट फूड मिक्सेस शिकवले जातील. तसेच कार्यशाळेत फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, पॅकेजिंग, लेबलिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, आवश्यक यंत्रसामग्री, वितरण व्यवस्था, कॉस्टिंग व कायदेशीर बाबी यांचाही समावेश असेल.

वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इ. बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १७ नोव्हेंबरपासून आयोजिली आहे. घर वास्तु दोष मुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘चहा-समोसा...!’ असा आवाज आता रेल्वे स्थानकांवर ऐकू येणार नाही; विक्रेत्यांचा आवाज थांबणार, प्रवाशांसाठी नवी योजना

Gadchiroli Solar School : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळा' उपक्रम!

Bee Attack : धान कापणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Ambegaon News: भीमाशंकर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात; जालना जिल्ह्यातील १७ भाविक जखमी!

Shegaon News : शेगाव मध्ये कार मधून जाणारी दहा लाख रोकड पकडली; निवडणूक विभागाच्या पथकाची कार्यवाही

SCROLL FOR NEXT