मुंबई

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने

CD

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिजनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रत्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २९ नोव्हेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तात्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

व्यावसायिक चाट आणि स्नॅक्स कार्यशाळा
चटपटीत चाट व स्नॅक्सचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास नेमकी काय पूर्वतयारी करावी याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये स्पेशल मिसळ, कटवडा, शाबू वडा, उपवासाचे पॅटीस व मिसळ, व्हेज बॉल्स, चीज कटलेट, वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या व पराठ्याचे प्रकार कसे करावेत हे प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच चाट स्पेशल पदार्थांमध्ये गोड व हिरवी चटणी, पाणीपुरी, आलू दहीपुरी, रगडा पॅटीस, मटकी भेळ, कोल्हापुरी स्पेशल भेळ, आलू टिक्की चाट, पकोडा चाट, इडली चाट, कॉर्न चाट, चना चाट, पापड चुरी चाट, पापडी चाट, दही वडा इत्यादी पदार्थ शिकवले जातील. व्यवसायाची सुरुवात, नोंदणी, ब्रॅण्डिंग, अन्न सुरक्षा मानके आदींबाबत माहिती दिली जाईल.

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला
व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इ.विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २९ व ३० नोव्हेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टीगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्युशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.

व्यावसायिक चटणी कार्यशाळा
जेवणातील चव वाढविणाऱ्या खमंग स्वादिष्ट आणि रुचकर अशा विविध पद्धतीच्या महाराष्ट्रीयन चटणी प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा ६ डिसेंबर रोजी आयोजिली आहे. रोजच्या आहारामध्ये चटण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला मोठे फायदे होतात. या अनुषंगाने कार्यशाळेत सोलापूरी शेंगदाणा, खोबरे, लसूण, कढीपत्ता, कारले, टोमॅटो, कांदा, पांचाली, थ्री इन वन, आवळा, कोर्टा, जवस अश्या विविध प्रकारच्या चटण्या तसेच दक्षिण भारतीय इडली, भात इ.सोबत खाल्ली जाणारी गन पावडर शिकवली जाणार आहे. व्यावसायिक कार्यशाळा असल्याने यामध्ये चटणी व्यवसाय कमी भांडवलामध्ये कसा सुरु करावा, व्यवसायाला असणारी मागणी, त्यामधील नाविन्यपूर्ण पद्धती, मिळणारा नफा चटणी टिकवण्याची पद्धत व पॅकेजिंग याबद्दलही माहिती दिली जाणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या आनंदनगर उड्डाण पुलावर अपघात

Rashmika & Vijay : रश्मिका–विजयचा विवाहसोहळ्यानंतर गावात पूजाअर्चा, देशभर अन्नदान

SCROLL FOR NEXT