मुंबई

एसआयआयएलसी

CD

हायड्रोपोनिक्स ऑनलाइन लेक्चर सीरिज
वाढत्या शहरीकरणात निसर्गाची आवड जोपासायची असेल तसेच ताजा व विषमुक्त भाजीपाला स्वतः पिकवायचा असेल, तर हायड्रोपोनिक्स शेती म्हणजेच मातीविरहित शेती हा एक उपयुक्त पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स, एरोपोनिक्स, घरासाठी हायड्रोपोनिक्स आणि हायड्रोपोनिक चारा इत्यादी संदर्भाने मार्गदर्शन करणारी पाच दिवसांची ऑनलाइन लेक्चर सीरिज ८ डिसेंबरपासून होणार आहे. यात हायड्रोपोनिक, एक्वापोनिक आणि एरोपोनिक प्रणाली लागू करण्यासाठीची व्यावहारिक कौशल्ये व माहिती, वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी घरगुती हायड्रोपोनिक्स व हायड्रोपोनिक चारा यांचे फायदे, शाश्वत शेती व पशुधन आहार उपायांमधील संधी याबाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लँडस्केप गार्डनिंग कार्यशाळा
घराच्या आजूबाजूला उपलब्ध जागेत आकर्षक लँडस्केप गार्डन तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान, गार्डनचे प्रकार, तयार करण्याची तत्वे, डिझाईन करण्याची पद्धत तसेच झाडांची निवड, गार्डन मधले रस्ते, बॉर्डरला लावली जाणारी झाडे व व त्यांची निवड आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ व १४ डिसेंबरला होणार आहे. कार्यशाळेत लँडस्केप गार्डनिंगचा परिचय, गार्डनमध्ये झाडांच्या वेगवेगळ्या डिझाइन तयार करण्याच्या पद्धती, साइटचे मुल्यांकन व तयारी, लँडस्केपिंग टेक्निक्स, खत व पाणी नियोजन, देखभाल पद्धती, पर्यावरणविषयक विचार, क्लायंट कम्युनिकेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सुरक्षा आणि नियम, लँडस्केप गार्डनिंगमधील भविष्यातील ट्रेंड आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. लँडस्केपिंगमध्ये करिअरच्या संधी शोधणाऱ्यांना तसेच वैयक्तिक बागकामामध्ये स्वारस्य असणाऱ्यांना कार्यशाळा उपयुक्त आहे.

हीलिंग गार्डन ऑनलाइन व्याख्याने
मन, शरीर आणि आत्मा यांचे पालनपोषण करणाऱ्या हीलिंग गार्डन विषयी माहिती देणारी ऑनलाईन व्यख्याने १५ डिसेंबरपासून होणार आहेत. खास आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुर्वेदिक उपचारात्मक वनस्पतींची लागवड असणारी हीलिंग गार्डन ही संकल्पना आहे. आराम, तणाव कमी करणे आणि भावनिक उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी व निसर्गाचे उपचारात्मक स्वरूप समजण्यास हीलिंग गार्डन मदत करते. ही कार्यशाळा लँडस्केप आर्किटेक्चर, गार्डन डिझायनर, आरोग्यसेवा व मानसशास्त्र संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक आणि उत्साही लोकांसाठी उपयुक्त आहे. कार्यशाळेत हीलिंग गार्डनचे डिझाईन प्रिन्सिपल, बायोफिलिक डिझाईन व नेचर इंटिग्रेशन, उपचारात्मक वनस्पतींचा परिचय व लागवड व्यवस्थापन आदींबाबत माहिती दिली जाईल.

शंख साधना कार्यशाळा
भारतीय संस्कृतीमध्ये शंख व त्याच्या ध्वनीला पावित्र्य आहे. ही एक खूप प्राचीन साधना आहे. शंख साधनेद्वारे श्वासोच्छवास लांब होतात व दम्यासारखे श्वसनाचे व थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांनी नियमित शंख साधना केल्यास धूम्रपानाचे व्यसन दूर होते. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंखसाधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. मुली आणि महिलाही ही साधना करू शकतात. या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबरला शंख साधनेविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शंख व सनातन धर्म, शंखाचे प्रकार, शंखाची नैसर्गिक निर्मिती, शंख नाद, शरीर व योग यांची माहिती व शंख नादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे.

एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२. क्यूआर कोड : PFA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT