औषधी वनस्पती लागवड ऑनलाइन कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षांत औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा १४ जुलैपासून होणार आहे. यात औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
रियल इस्टेट मेंटॉरशिप प्रोग्रॅम
ज्या लोकांना रियल इस्टेट क्षेत्रात कौशल्य प्राप्त करायचे आहे, ज्यांना अतिशय श्रीमंत जीवनशैली जगण्याची इच्छा व स्थिर व्यवसाय हवा आहे, अशांसाठी तीन महिन्यांचा रियल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम १४ जुलैपासून सुरू होत आहे. ‘महारेरा’ची अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या ‘एसआआयएलसी’तर्फे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत. करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श असे हे प्रशिक्षण असणार आहे. रियल इस्टेट मास्टर ट्रेनर व या क्षेत्रातील अनेक प्रकाशित पुस्तकांचे तज्ज्ञ लेखक रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. प्रशिक्षणाचे प्रतिव्यक्ती शुल्क ५०,००० रुपये अधिक जीएसटी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ९५०३६५५२७७
व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन १९, २० तसेच २६, २७ जुलैला करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश व्हिडिओ एडिटिंग कौशल्यांसह सहभागींना सक्षम करणे हा आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीप या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
शंख साधना कार्यशाळा
भारतीय संस्कृतीत शंख व त्याच्या ध्वनीला पावित्र्य आहे. ही एक खूप प्राचीन साधना आहे. शंखसाधनेद्वारे श्वासोच्छवास लांब होतात व दम्यासारखे श्वसनाचे व थायरॉइड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात, असा अनेकांचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात, त्यांनी नियमित शंख साधना केल्यास धूम्रपानाचे व्यसन दूर होते. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंखसाधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. मुली आणि महिलाही ही साधना करू शकतात. या पार्श्वभूमीवर २० जुलैला शंख साधनेविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा होणार आहे. यात शंख व सनातन धर्म, शंखांचे प्रकार, शंखांची नैसर्गिक निर्मिती, शंखनाद, शरीर व योग यांची माहिती व शंखनादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.