मुंबई

सकाळ कनेक्ट

CD

एसआयआयएलसी

ज्युनियर आंत्रप्रेन्यूअर कार्यशाळा
पुणे, ता. १३ : खास १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर आंत्रप्रेन्युअर ही चार तासांची कार्यशाळा शुक्रवारी (ता. १५) आयोजित केली आहे. या कार्यशाळेत उद्योजकीय मानसिकता, स्टार्टअप प्रक्रियेची माहिती, व्यवसाय सादरीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये कोणती, स्टार्टअप कसा सुरू करावा, कोणती रणनीती वापरावी आणि व्यवसाय कसा सादर करावा याचीही माहिती दिली जाईल. उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात शनिवारी (ता. १६) आयोजित केले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, यंत्रसामग्री, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

रोबोटिक्स, एआय समर कॅम्पचे आयोजन
रोबोटिक्स, कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी दोनदिवसीय समर कॅम्पचे १८ व १९ मे रोजी आयोजन केले आहे. यादरम्यान रोबोटिक्सची मूलभूत माहिती, सेन्सर्स, मोटर्स व मायक्रोकंट्रोलर्स यांची ओळख, तसेच रोबोट कोडिंग व प्रोग्रामिंग बेसिक्स शिकवले जाणार आहेत. याबरोबरच एआय, फेस व इमोशन डिटेक्शन यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना एआयची प्राथमिक माहिती दिली जाईल. शालेय विद्यार्थी तसेच रोबोटिक्स आणि एआयमध्ये रस असणाऱ्यांसाठी कॅम्प उपयुक्त ठरणार असून, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

(एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७)

‘लीव्ह अँड लायसन्स’ मास्टरक्लास
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. मात्र, योग्य करारनामा तयार करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर शुल्क भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया, तसेच पोलिसांना कळवणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याचसाठी याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास २६ मे रोजी आयोजित केला आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ते ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाणार आहे. तसेच, ११ महिन्यांच्या कराराची नोंदणी बंधनकारक का आहे, कोणती कागदपत्रे लागतात, पोलिस इंटिमेशनचे महत्त्व आणि सरकारमान्य स्वरूपांचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ७३५०००१६०२, ७३५०००१६०३, ८९५६३४४४७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT