एसआयआयएलसी
ऑनलाइन समर कॅम्प
पुणे, ता. १५ : मुलांना परदेशी भाषेची ओळख करून देण्यासाठी सहा दिवसांचा एक विशेष ऑनलाइन समर कॅम्प शनिवार (ता. १६) पासून आयोजिला आहे. आजच्या जागतिक युगात परदेशी भाषांचे महत्त्व वाढत असून, लहान वयात नवीन भाषा शिकल्याने मुलांची संवादकौशल्ये, आत्मविश्वास आणि जागतिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. याच उद्देशाने या समर कॅम्पमध्ये बेसिक जर्मन शब्द, संवाद कौशल्य, जर्मन ग्रीटिंग्जची ओळख करून दिली जाणार आहे. याशिवाय योग्य उच्चारांचा व बोलण्याचा सराव, विविध गेम्स, क्वीझ आणि परस्परसंवादी शिक्षण उपक्रमांद्वारे मुलांना आनंददायी वातावरणात भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाइन लाइव्ह सत्रांमुळे विद्यार्थी घरबसल्या या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
रोबोटिक्स व एआय समर कॅम्प
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत रोबोटिक्स, कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी दोनदिवसीय समर कॅम्पचे सोमवार (ता. १८) व मंगळवारी (ता. १९) आयोजन केले आहे. प्रशिक्षणादरम्यान रोबोटिक्सची मूलभूत माहिती, सेन्सर्स, मोटर्स व मायक्रोकंट्रोलर्सची ओळख, तसेच रोबोट कोडिंग व प्रोग्रॅमिंग बेसिक्स शिकवले जाणार आहेत. यासोबतच एआय, फेस व इमोशन डिटेक्शन यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना एआयची प्राथमिक माहिती दिली जाईल. या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोडिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सृजनशीलता आणि नावीन्यता इत्यादी कौशल्यांचा विकास होईल. शालेय विद्यार्थी तसेच रोबोटिक्स आणि एआयमध्ये रस असणाऱ्यांसाठी हा कॅम्प उपयुक्त ठरणार असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देणार आहे.
व्यावसायिक लोणचे कार्यशाळा
महाराष्ट्रीयन जेवणामध्ये लोणच्याला विशेष महत्त्व आहे व विविध प्रकारच्या लोणच्यांना खूप मोठी बाजारपेठ आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक पद्धतीने लोणचे कसे तयार करावे याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २३ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये आंबा, लिंबू, मिक्स, मिरची, आवळा, तिखट लिंबू, हळद, चिंच, लसूण, गावरान, राजस्थानी, लिंबू चुन्दा, आंबा चुन्दा, ड्रायफ्रूट, खजूर, टोमॅटो, हैदराबादी, कारले, अंबाडी इत्यादी प्रकारचे लोणचे प्रात्यक्षिकासह शिकविणार आहे. यासह कार्यशाळेत लोणच्याच्या व्यावसायिक पद्धती, लोणचे साठवण्याची व टिकवण्याची प्रक्रिया, प्रीझर्वेशनच्या पद्धती त्याचप्रमाणे ब्रॅण्डिंग, कॉस्टिंग, पॅकिंग व बाजारपेठेविषयी मार्गदर्शन होईल.
सीएसआर प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज असते. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र, हा निधी कसा मिळवावा, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रकल्प अहवाल कसा सादर करावा याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर प्रशिक्षण ३० मे रोजी आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणी प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर निधीसाठी कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.