पुणे, ता. २० : प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश महारेराने दिला आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
शेतजमीन कायदे,
हक्क, नोंदणी, महसूल
शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना इ. शेतजमीनविषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा इ. याविषयी माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा २६ सप्टेंबरला आयोजित केली आहे. यात तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाइन कसे मिळवावे, विविध ऑनलाइन उपलब्ध साधने कशी वापरावी इ.बद्दल रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. आपण जमीन मालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट असाल तर कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
जमीन गुंतवणूक
व्यवसायाबाबत मार्गदर्शन
जमिनीचे भाव हे सर्वत्र आणि सतत वाढत असल्याने म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर्स यांसारख्या गुंतवणुकीपेक्षा जमिनीतील गुंतवणूक जास्त फायद्याची ठरते. गुंतवणुकीचा पर्याय म्हणून जमिनीकडे कसे बघावे व त्यातून पैसा कसा उभारावा, यासंदर्भात मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २७ सप्टेंबरला आयोजित केली आहे. कार्यशाळेत जमिनीची मूलभूत माहिती, प्रकार, क्षेत्र आणि दस्तऐवजीकरण, स्पर्धक विश्लेषण आणि बाजार संशोधन, जमीन शोधणे व त्याचे नियोजन, बँकिंग आणि निधी, विकास आणि विपणन, मालमत्ता व्यवस्थापन आदी विषयांवर रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोट्स दिल्या जातील आणि १०० टक्के व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.