मुंबई

व्यावसायिक बेकरी उद्योगावर विशेष कार्यशाळा

CD

व्यावसायिक बेकरी कार्यशाळा
पुणे, ता. १० ः बेकरी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजक, स्वयंसहाय्यता गट, गृहउद्योग करणाऱ्या महिला व नवउद्योजकांसाठी व्यावसायिक बेकरी कार्यशाळेचे २१ व २२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत बेकरी उद्योगातील उत्पादन तंत्रज्ञान, विविध उत्पादने आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक सर्व बाबींवर सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच ब्रेड व त्याचे विविध प्रकार, बिस्किटे, नानकटाई, कराची बिस्कीट, नावीन्यपूर्ण कुकीज, टोस्ट, खारी, बटर आयटेम्स, कप केक, केकचे विविध प्रकार, डोनट्स, बन्स, लादी पाव तसेच इतर बेकरी उत्पादने प्रत्यक्ष पद्धतीने शिकवली जाणार आहेत. याशिवाय बेकरीसाठी आवश्यक मशिनरी, त्याचे कॉस्टिंग, पॅकिंग व लेबलिंगचे महत्त्व, कच्चा माल व्यवस्थापन, तसेच बेकरी स्टार्टअप सुरू करण्याची प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. अन्न सुरक्षा परवाने, लायसन्सिंग आणि कायदेशीर बाबी यांची माहितीही या कार्यशाळेत देण्यात येईल.

‘सुपर अ‍ॅग्री-बिझनेस २०२६’ प्रशिक्षणाचे आयोजन
शेती व कृषी व्यवसाय क्षेत्रात भविष्यातील संधी ओळखून शेतकरी व नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी फ्युचर रेडी सुपर अ‍ॅग्र-बिझनेस २०२६ या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. पारंपरिक शेतीत उत्पन्न वाढत नसण्यामागची कारणे समजावून सांगत, २०२६मध्ये उपलब्ध होणाऱ्या नव्या कृषी-व्यवसाय संधींबाबत सहभागींसाठी सविस्तर माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यामध्ये कमी क्षेत्रात अधिक उत्पादन देणाऱ्या ‘स्क्वेअर इंच शेती’ संकल्पनेपासून स्मार्ट व शाश्वत शेती पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ई-कॉमर्सद्वारे उत्पादन विक्री, ब्रँडिंग व पॅकेजिंग, तसेच थेट ग्राहकांपर्यंत विक्री मॉडेल यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच पीएमएफएमई, नाबार्ड आणि कृषी पायाभूत निधी यांसारख्या शासकीय योजनांतून निधी, कर्ज व अनुदान कसे मिळवावे, याची माहितीही दिली जाणार आहे. प्रशिक्षणामुळे सहभागी शेतकरी व उद्योजकांना स्वतःसाठी योग्य कृषी-व्यवसाय कल्पना निवडता येतील, खर्च नियंत्रणात ठेवून नफा वाढवण्याच्या आधुनिक पद्धती समजतील आणि बदलत्या बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी आवश्यक दिशा मिळेल. भविष्यातील शेतीला व्यवसायी दृष्टिकोन देण्यासाठी हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च तसेच ७ व ८ मार्च रोजी करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश व्हिडिओ एडिटिंग कौशल्यांसह सहभागींना सक्षम करणे हा आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडीओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स,ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीपा या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer News : तुकाराम मुंढे यांची बदली होणार?, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत दिली माहिती

Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक घटना! कोयत्याचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलासमोर विवाहितेवर अत्याचार, आरोपीला अटक

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

SCROLL FOR NEXT