मुंबई

ब्युटी व वेलनेस क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षणे

CD

एसआयआयएलसी

ब्युटी व वेलनेससाठी कार्यशाळा

पुणे, ता. २१ : ब्युटी व वेलनेस क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी, महिला व नवउद्योजकांसाठी विविध प्रात्यक्षिक कार्यशाळा व कोर्सेस आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये पर्सनल मेकअप वर्कशॉप, पर्सनल हेअरस्टाइल्स वर्कशॉप, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट्री वर्कशॉप, मेकअप मास्टरक्लास, एअरब्रश मास्टरक्लास, तसेच साडी ड्रेपिंग वर्कशॉपचा समावेश आहे. प्रोफेशनल्ससाठी तीन दिवसीय अ‍ॅडव्हान्स एस्थेटिक ट्रीटमेंट मास्टरक्लास होणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडवण्यासाठी इंटरनॅशनल डिग्री प्रोग्रॅम्स उपलब्ध आहेत. या सर्व कोर्सेसमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच व्यवसाय व करिअर संधींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

साउथ इंडियन रेस्टॉरंट
व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
साउथ इंडियन खाद्यपदार्थांना वाढती मागणी आणि या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण बदल लक्षात घेऊन या विषयावर मार्गदर्शन करणारी व्यावसायिक कार्यशाळा २५ व २६ एप्रिलला आयोजिली आहे. यात साधी, तट्टे, पुडी व फ्राइड इडली; साधा, पेपर, दावणगिरी लोणी स्पंज, स्प्रिंग, चीज, म्हैसूर मसाला, घी, रागी डोसा; मेदूवडा, लेमन राइस, कर्ड राइस, मैसूर बोंडा यांसह विविध प्रकार शिकवले जाणार आहेत. तसेच साउथ इंडियन सांबर, सांबर मसाला, ओनियन उत्तप्पा, कोकोनट चटणी आणि इतर चटण्या तयार करण्याचे तंत्र प्रात्यक्षिकांद्वारे समजावले जाईल. याशिवाय साउथ इंडियन व्यवसायातून स्टार्टअप कसा सुरू करावा, शासकीय योजना, नफा नियोजन आणि फ्रँचायझी मॉडेल विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय, नोंदणी कशी करावी, कागदपत्रे कोणती, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २५ व २६ एप्रिलला आयोजिली आहे. यात उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स कसे हाताळावे, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन होईल.

प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी व्यवसाय
प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी २५ व २६ एप्रिलला प्रशिक्षण आयोजिले आहे. यात प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी कायद्याची माहिती, परवाना मिळवण्याची प्रक्रिया तसेच कागदपत्रांची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच मनुष्यबळ व्यवस्थापन, सिक्युरिटी गार्डची निवड व प्रशिक्षण तसेच कार्यक्षम टीम उभारण्याच्या पद्धती, व्यवसायाचे कॉस्टिंग, सेवा दर ठरवणे, क्लायंट मिळवण्याच्या युक्त्या, मार्केटिंग तंत्र आणि व्यवसाय विस्तारासाठी धोरणांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT