मुंबई

लँडस्केप गार्डनिंग कार्यशाळा

CD

घराच्या आजूबाजूला उपलब्ध जागेमध्ये आकर्षक लँडस्केप गार्डन तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान, गार्डनचे प्रकार, तयार करण्याची तत्त्वे, डिझाइन करण्याची पद्धत तसेच झाडांची निवड, गार्डनमधले रस्ते, बॉर्डरला लावली जाणारी झाडे व व त्यांची निवड आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १७ व १८ जानेवारी रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत लँडस्केप गार्डनिंगचा परिचय, गार्डनमध्ये झाडांच्या वेगवेगळ्या डिझाइन तयार करण्याच्या पद्धती, साइटचे मूल्यांकन व तयारी, लँडस्केपिंग टेक्निक्स, खत व पाणी नियोजन, देखभाल पद्धती, पर्यावरणविषयक विचार, क्लायंट कम्युनिकेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सुरक्षा आणि नियम, लँडस्केप गार्डनिंगमधील भविष्यातील ट्रेंड आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. लँडस्केपिंगमध्ये करिअरच्या संधी शोधणाऱ्यांना तसेच वैयक्तिक बागकामामध्ये स्वारस्य असणाऱ्यांना कार्यशाळा उपयुक्त आहे.

डिजिटल मार्केटिंग व एआय तंत्रज्ञान कार्यशाळा
डिजिटल युगातील वाढती संधी लक्षात घेऊन ‘डिजिटल मार्केटिंग व एआय तंत्रज्ञान’ या विषयावरील ऑनलाइन कार्यशाळा १७ जानेवारीपासून सुरू होत आहे. डिजिटल मार्केटिंगसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शिकवून सहभागींच्या करिअरला नवी दिशा देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. आजच्या स्पर्धात्मक काळात डिजिटल मार्केटिंग आणि एआय ही सर्वाधिक मागणी असलेली कौशल्ये मानली जात असून ही कार्यशाळा विद्यार्थी, नोकरी शोधणारे युवक, व्यावसायिक उद्योजक यांच्यासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेत ग्राफिक डिझाइन, सोशल मीडिया मार्केटिंग (फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डइन), गुगल अ‍ॅड्सद्वारे जाहिरात, वेबसाइट तयार करणे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तसेच विविध एआय टूल्सचा प्रभावी वापर शिकवला जाणार आहे. एकूण ३५ पेक्षा अधिक मॉड्युल्सद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यानंतर सहभागींसाठी इंडस्ट्री-रेडी डिजिटल स्किल्स, एआय आधारित प्रॅक्टिकल ट्रेनिंग, प्रमाणपत्र तसेच नोकरी व करिअर संधींसाठी मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. सीएसआर फंडिंगमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र हे फंडिंग कसे मिळवावे, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सादर करावा याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर ट्रेनिंग १७ व १८ जानेवारी रोजी आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर फंडिंगसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे. हे प्रशिक्षण समाजसेवी संस्था, फाउंडेशन्स, सीएसआर क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे अधिकारी तसेच विद्यार्थी यांना उपयुक्त आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT