एसआयआयएलसी
आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. १२ : आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १४ मार्चपासून ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
क्लाउड किचन व्यवसाय मार्गदर्शन
कमी गुंतवणुकीत स्वतःचा क्लाउड किचन व्यवसाय कसा सुरू करायचा याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ मार्च रोजी आयोजिली आहे. क्लाउड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघरातील जागा वापरून फक्त डिलिव्हरी किंवा टेकअवेसाठी अन्न तयार केले जाते, ज्यामध्ये संपूर्ण रेस्टॉरंट सेटअपची आवश्यकता नसते. यामुळे हा खूप स्वस्त आणि सुरुवात करण्यास सोपा असा व्यवसाय आहे. कार्यशाळेत स्वतःचा क्लाउड किचन ब्रँड कसा सुरू करावा, घरून मेस किंवा कॅन्टीन कसे चालवावे, कॅफे किंवा रेस्टॉरंट्सद्वारे स्वयंपाकघर कसे व्यवस्थापित करावे, स्वच्छता आणि सुरक्षितता कशी राखावी यासह सरकारी नियम, परवाने आणि नियम याबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल, टिफिन सेवा किंवा मेस व्यवसाय उघडायचा आहे, परंतु मोठे बजेट नाही त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
वास्तुशास्त्र कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इ. बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १६ मार्चपासून आयोजिली आहे. घर वास्तुदोषमुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरूष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७. क्यूआर कोड : PFA
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.