मुंबई

सुपर अ‍ॅग्री-बिझनेस प्रशिक्षणाचे आयोजन

CD

एसआयआयएलसी

कृषी व्यवसायासाठी विशेष प्रशिक्षण

पुणे, ता. १६ : शेती व कृषी व्यवसाय क्षेत्रात भविष्यातील संधी ओळखून शेतकरी व नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी फ्युचर रेडी सुपर अ‍ॅग्री बिझनेस २०२६ या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन २१ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. पारंपरिक शेतीत उत्पन्न वाढत नसण्यामागची कारणे समजावून सांगत, २०२६ मध्ये उपलब्ध होणाऱ्या नव्या कृषी-व्यवसाय संधींबाबत सहभागींसाठी सविस्तर माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यामध्ये कमी क्षेत्रात अधिक उत्पादन देणाऱ्या ‘स्क्वेअर इंच शेती’ संकल्पनेपासून स्मार्ट व शाश्वत शेती पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ई-कॉमर्सद्वारे उत्पादन विक्री, ब्रँडिंग व पॅकेजिंग, तसेच थेट ग्राहकांपर्यंत विक्री मॉडेल यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच पीएमएफएमई, नाबार्ड आणि कृषी पायाभूत निधी यांसारख्या शासकीय योजनांतून निधी, कर्ज व अनुदान कसे मिळवावे, याची माहितीही दिली जाणार आहे.

व्यावसायिक बेकरी उद्योग
बेकरी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजक, स्वयंसहाय्यता गट, गृहउद्योग करणाऱ्या महिला व नवउद्योजकांसाठी व्यावसायिक बेकरी कार्यशाळेचे २१ व २२ फेब्रुवारीला आयोजन केले आहे. बेकरी उद्योगातील उत्पादन तंत्रज्ञान, विविध उत्पादने आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक सर्व बाबींवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ब्रेड व त्याचे विविध प्रकार, बिस्किटे, नानकटाई, कराची बिस्कीट, नावीन्यपूर्ण कुकीज, टोस्ट, खारी, बटर आयटम्स, कप केक, केकचे विविध प्रकार, डोनट्स, बन्स, लादी पाव तसेच इतर बेकरी उत्पादने प्रत्यक्ष पद्धतीने शिकवली जाणार आहेत. याशिवाय बेकरीसाठी मशिनरी, कॉस्टिंग, पॅकिंग व लेबलिंगचे महत्त्व, कच्चा माल व्यवस्थापन, तसेच बेकरी स्टार्टअप सुरू करण्याची प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. अन्न सुरक्षा परवाने, लायसन्सिंग आणि कायदेशीर बाबी यांची माहितीही देण्यात येईल.

एनजीओ नोंदणीबाबत प्रशिक्षण
विविध कामांसाठी स्वयंसेवी संस्था अर्थात ‘एनजीओं’ना प्राधान्य दिले जाते. याद्वारे विकास, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. अशा या स्वयंसेवी संस्थेची स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, संस्थेची कामकाज पद्धती, सीएसआरचे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन अशा स्वयंसेवी संस्थांशी निगडितविषयी माहिती देणारे प्राथमिक प्रशिक्षण २१ फेब्रुवारीला, तर प्रगत प्रशिक्षण २२ फेब्रुवारीला आयोजिले आहे. यात संस्थेची स्थापना कशी करावी, प्रशासकीय दस्तऐवजीकरण करण्याची पद्धत, धर्मादाय आयोग व इतर सरकारी विभागांशी संपर्क कसा साधावा, प्रस्ताव तयार करणे व सादर करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, वार्षिक ताळेबंद, अहवाल कसे तयार करावेत, एनजीओद्वारे शासकीय योजनांची अंमलबजावणी, संस्था नोंदणीनंतरची कागदपत्रे इ.विषयी मार्गदर्शन होईल.

संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुधारणेचे फायदे मिळणार? मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाचा अर्थ काय?

गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर माफी मागायला पनवेलच्या जंगलात पोहोचला; तिच्या आत्म्याला बोलावल्याचा दावा, तरुणाला अटक

Army Recruitment Update : नोकरीसाठी सुवर्णसंधी! माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सैन्य दलात भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

IRE vs ZIM सामन्यावर पावसाचं सावट; जर मॅच झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाचं काय होणार? धक्कादायक निकाल

नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईकांची एकाधिकारशाही, मंदा म्हात्रे समर्थकांना पुन्हा डावलल्याने भाजपातील अंतर्गत संघर्ष तीव्र

SCROLL FOR NEXT