मुंबई

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा

CD

व्हिडिओ एडिटिंगची कार्यशाळा
पुणे, ता. २२ : चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च तसेच ७ व ८ मार्चला करण्यात आले आहे. या कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टिपा या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.

पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा ६, ७ व ८ मार्चला आयोजिली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, आवश्यक उपकरणांची माहिती तसेच शासन नियमाबाबत सखोल मार्गदर्शन मिळेल. यासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, निविदा प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार, तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला
व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा ७ व ८ मार्चला आयोजिली आहे. यात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्युशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमानाचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही- सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT