मुंबई

सकाळ कनेक्ट

CD

एसआयआयएलसी

‘एनजीओ’ नोंदणीबाबत प्रशिक्षण
स्वयंसेवी संस्थेची स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, संस्थेची कामकाज पद्धती, ‘सीएसआर’चे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन अशा स्वयंसेवी संस्थांशी निगडित विषयांची माहिती देणारे प्राथमिक प्रशिक्षण २८ फेब्रुवारीला; तर प्रगत प्रशिक्षण एक मार्चला आयोजित केले आहे. यात संस्थेची स्थापना कशी करावी, प्रशासकीय दस्तऐवजीकरण करण्याची पद्धत, धर्मादाय आयोग व इतर सरकारी विभागांशी संपर्क कसा साधावा, प्रस्ताव तयार करणे व सादर करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, वार्षिक ताळेबंद, अहवाल कसे तयार करावेत, ‘एनजीओ’द्वारे शासकीय योजनांची अंमलबजावणी, संस्था नोंदणीनंतरची आवश्यक कागदपत्रे इ.विषयी मार्गदर्शन होईल.

‘सुपर अ‍ॅग्री-बिझनेस’ प्रशिक्षण
ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत या प्रशिक्षणात फूड प्रोसेसिंग, व्हॅल्यू अ‍ॅडिशन, अ‍ॅग्री-स्टार्टअप व सेवा आधारित उच्च नफा देणाऱ्या शेती व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये कमी जमिनीत जास्त उत्पन्न देणारी स्क्वेअर इंच फार्मिंग संकल्पना, स्मार्ट व शाश्‍वत शेती पद्धती, ई-कॉमर्सद्वारे थेट विक्री, ब्रँडिंग व पॅकेजिंग, तसेच ‘पीएमएफएमई’, एआयएफ व नाबार्ड योजनांमधील अनुदान व कर्ज मार्गदर्शन यावर माहिती दिली जाणार आहे. हे प्रशिक्षण २८ फेब्रुवारीला आयोजित केले आहे.

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २८ फेब्रुवारीला आयोजित केली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवर उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन होईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

‘लीव्ह अँड लायसन्स’ मास्टरक्लास
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. या प्रक्रियेतून मालकाचे हक्क सुरक्षित राहतात आणि भाडेकरूस तात्पुरते निवास किंवा व्यावसायिक वापराचे अधिकार मिळतात. मात्र, योग्य करारनामा तयार करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर शुल्क भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया, तसेच पोलिसांना कळविणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास ९ मार्चला आयोजित केला आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ते ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाणार आहे. घरमालक, रिअल इस्टेट एजंट, वकील, बिल्डर, तसेच अतिरिक्त उत्पन्न कमावू इच्छिणारे सर्वांसाठी कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT