एसआयआयएलसी
व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
पुणे, ता. २४ : चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च तसेच ७ व ८ मार्चला करण्यात आले आहे. यात एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टिप्सबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन होणार आहे.
पेस्ट कंट्रोल व्यवसाय
प्रशिक्षण कार्यशाळा
पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा ६, ७ व ८ मार्चला आयोजिली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, उपकरणांची माहिती तसेच शासन नियमांबाबत मार्गदर्शन मिळेल. यासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, निविदा प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य इत्यादींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
महिलादिनानिमित्त
आरोग्यावर विशेष कार्यशाळा
महिलादिनाचे औचित्य साधून महिलांच्या हार्मोनल आरोग्यासाठी श्वसन, कपालभाती आणि शंखनाद या नैसर्गिक तंत्रांवर आधारित विशेष आरोग्य कार्यशाळा ८ मार्चला आयोजिली आहे. कार्यशाळा केवळ महिलांसाठी आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढता ताणतणाव, अनियमित दिनचर्या, प्रदूषण आणि चुकीच्या श्वसन पद्धतीमुळे महिलांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता, पीसीओडी/पीसीओएस यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतींच्या माध्यमातून हार्मोनल संतुलन कसे राखता येईल, याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. योग्य श्वसन पद्धती, कपालभातीचा वैज्ञानिक उपयोग, शंखनादाचे आरोग्यदायी फायदे, हार्मोनल संतुलनासाठी नैसर्गिक उपाय तसेच अंतर्गत ऊर्जा जागृत करण्याचे मार्ग शिकवले जाणार आहेत.
आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात. यासाठी फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरण असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १४ मार्चपासून ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. यात एक्झिम धोरण, इन्को टर्म्स, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश आहे. स्टार्टअप्स, लघु उद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.