मुंबई

एसआयआयएलसी

CD

आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने प्रशिक्षण
पुणे, ता. १४ ः आयुर्वेदिक पद्धतीने विविध सौंदर्य उत्पादने तयार करण्याचे मार्गदर्शन करणारे विशेष प्रशिक्षण २२ मार्चला आयोजिले आहे. प्रशिक्षणात नैसर्गिक घटकांचा वापर करून सुरक्षित आणि त्वचेसाठी उपयुक्त सौंदर्य उत्पादने कशी तयार करावीत, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे. फेस क्रीम, शॅम्पू, फेसवॉश, साबण, लिप बाम, परफ्यूम, फेस पॅक, काजळ आदी विविध उत्पादने तयार करण्याच्या पद्धती शिकवण्यात येणार आहेत. यासोबतच नैसर्गिक घटकांची निवड, उत्पादन तयार करताना घ्यावयाची काळजी, साठवणूक पद्धती तसेच बाजारपेठेतील मागणी याविषयीही माहिती दिली जाणार आहे. नैसर्गिक सौंदर्य उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता या प्रशिक्षणातून सहभागी महिलांना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.

कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. सीएसआर फंडिंगमधून त्यांना ही गरज भागवता येते; मात्र हे फंडिंग कसे मिळवावे, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सादर करावा, याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर ट्रेनिंग २८ व २९ मार्चला आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर फंडिंगसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.

शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा २९ मार्चला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, शेवगा निर्यातीसाठी परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ.संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
क्यूआर कोड : PFA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT