मुंबई

आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने प्रशिक्षण

CD

एसआयआयएलसी

पुणे, ता. १८ : आयुर्वेदिक पद्धतीने विविध सौंदर्य उत्पादने तयार करण्याचे मार्गदर्शन करणारे विशेष प्रशिक्षण २२ मार्चला आयोजिले आहे. प्रशिक्षणात नैसर्गिक घटकांचा वापर करून सुरक्षित आणि त्वचेसाठी उपयुक्त सौंदर्य उत्पादने कशी तयार करावीत याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे. फेस क्रीम, शॅम्पू, फेसवॉश, साबण, लीप बाम, परफ्यूम, फेस पॅक, काजळ अशी विविध उत्पादने तयार करण्याच्या पद्धती शिकविणार आहेत. यासोबतच नैसर्गिक घटकांची निवड, उत्पादन तयार करताना घ्यावयाची काळजी, साठवणूक पद्धती तसेच बाजारपेठेतील मागणी याविषयीही माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणातून सहभागी महिलांना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.

सीएसआर प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र हा निधी कसा मिळवावा, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रकल्प अहवाल कसा सादर करावा याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर प्रशिक्षण २८ व २९ मार्चला आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर निधीसाठी कागदपत्रे व प्रक्रिया अशा बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.

शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्‍वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २९ मार्चला आयोजिले आहे. यात विविध विभागांतील नोंदणी, निविदा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रे, डिजिटली सही, ईएमडी व एसडीमध्ये सवलत कशी मिळवायची, मशिनरी नसल्यास भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल मार्गदर्शन होणार आहे. सरकारी कंत्राटदार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, मटेरिअल पुरवठादार, वाहतूक करणारे, कौशल्य विकास क्षेत्रात काम करणारे, बचत गट, मॅनपॉवर सप्लाय एजन्सी आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ४ एप्रिलला आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ आणि त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्पासाठी जागेची निवड, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT