एसआयआयएलसी
पीक व्यवस्थापन कार्यशाळा
पुणे, ता. २५ : स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधांमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा २९ मार्चला आयोजिली आहे. यात निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, कागदपत्रांची पूर्तता, निर्यातीचे नियम इ.संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ४ एप्रिलला आयोजिले आहे. यात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, जागेची निवड, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी
प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी हा एक विशेष प्रकार आहे. सध्या कॅमेऱ्यातूनही प्रॉडक्ट्सचे वेगळेपण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून अधिक उठावदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचते. याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण ५ एप्रिलला आयोजिले आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचे प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायाला प्रोफेशनल लूक देण्यासाठी, ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवून स्पर्धेत टिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.