मुंबई

‘वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल्स’च्या यादीत कोकिलाबेन रुग्णालय ‘वर्ल्ड्स बेस्ट’मध्ये स्थान

CD

‘वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल्स’च्या यादीत कोकिलाबेन रुग्णालय

मुंबई, ता. २६ : आरोग्य सेवा क्षेत्रातील आघाडीचे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने ‘न्यूजविक’ आणि ‘स्टॅटिस्टा’ यांच्या ‘वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल्स २०२६’ यादीत पुन्हा एकदा स्थान पटकाविले आहे. या ऐतिहासिक यशासह हे रुग्णालय सलग सातव्या वर्षी जगातील सर्वोत्तम वैद्यकीय केंद्रांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

‘न्यूजविक’ आणि ‘स्टॅटिस्टा’ यांनी जगातील ३२ देशांमधील २,५००पेक्षा जास्त रुग्णालयांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा देशातील सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये समावेश करण्यात आला. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, रुग्णांच्या वैयक्तिक गरजांनुसार उपचार करून अंबानी हॉस्पिटल जागतिक दर्जाचे निकष यशस्वीपणे पाळत आहे.

‘वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल्स’च्या रँकिंगला आरोग्य सेवांच्या गुणवत्तेसाठी एक अत्यंत विश्वसनीय निकष मानले जाते. यामध्ये रुग्णालयांची कामगिरी, रुग्णांचा अनुभव, सुरक्षिततेचे नियम आणि जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या शिफारसी आदींच्या आधारावर रुग्णालयांची पारख केली जाते. ‘फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम’, विविध विभागांचा परस्पर समन्वय आणि डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म, एआयआधारित तपासणी व रोबोटिक सर्जरी अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर रुग्णालयाने हे यश मिळविले आहे.

हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, ‘‘भारत आणि जगातील सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा स्थान मिळविणे आणि गेल्या सात वर्षांपासून सतत या यादीत टिकून राहणे, हे रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या आमच्या अढळ संकल्पाचे फळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT