पुणे, ता. ३ : शेतापासून ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचविण्याच्या प्रक्रियेतील ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर’ या विषयाचे व्यावहारिक ज्ञान देणारा चार महिन्यांचा विशेष ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सकाळ ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे सुरू करण्यात येत आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपासून पदवीधरांपर्यंत इच्छुकांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कृषी पुरवठा साखळी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या अभ्यासक्रमासाठी ईशान्य फाउंडेशनतर्फे पात्र व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असून, त्यांना केवळ साडेसात हजार रुपये शुल्कात अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. चार महिन्यांच्या ऑनलाइन प्रशिक्षणासोबत दोन महिन्यांची इंडस्ट्री इंटर्नशिप आणि प्लेसमेंटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमात शेतमाल काढणीनंतरचे व्यवस्थापन, खरेदी व संकलन, गोदाम व साठा व्यवस्थापन, कोल्ड चेन, वाहतूक व वितरण व्यवस्थापन, कृषी विपणन इत्यादी विषयांचा समावेश आहे. तसेच ईआरपी, सीआरएम, डेटा ॲनॅलिटिक्स, आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा कृषी व्यवसायातील वापर याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रात्यक्षिक अनुभवासाठी गोदामे, कोल्ड स्टोरेज, कृषी प्रक्रिया उद्योग आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांना क्षेत्रभेटीही आयोजित करण्यात येणार आहेत.
नोकरीच्या विविध संधी
या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कृषी पुरवठा साखळी क्षेत्रातील विविध पदांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामध्ये ॲग्री सप्लाय चेन एक्झिक्युटिव्ह, प्रोक्युअरमेंट एक्झिक्युटिव्ह, वेअरहाऊस मॅनेजर, इन्व्हेंटरी एक्झिक्युटिव्ह, लॉजिस्टिक्स एक्झिक्युटिव्ह, कोल्ड चेन एक्झिक्युटिव्ह, ॲग्री मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि सप्लाय चेन ॲनॅलिस्ट इत्यादी पदांचा समावेश आहे. या क्षेत्रातील कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी मिळू शकतात.
अधिक माहितीसाठी ८४८४८२२१६६ या नंबरवर संपर्क करा. तसेच नावनोंदणीसाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.