मुंबई

आयात-निर्यात व्यवसायातील संधींबाबत प्रशिक्षण

CD

पुणे, ता. १ : भारतीय उत्पादनांना परदेशात मिळणारी वाढती मागणी आणि देशांतर्गत बाजारपेठेत आयात उत्पादनांना असलेली पसंती यामुळे आयात-निर्यात व्यवसायात नव्या संधी निर्माण होत आहेत, मात्र या व्यवसायातील प्रक्रिया, नियम आणि कागदपत्रांची पुरेशी माहिती नसल्याने अनेक व्यापारी आणि नवउद्योजक या संधींचा लाभ घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ‘आयात-निर्यात व्यापार व्यवस्थापन’ या विषयावर १४ नोव्हेंबरला एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित केले आहे. यात आयात-निर्यातीच्या मूलभूत अटी, प्रमुख संकल्पना, व्यापार प्रक्रिया आणि निर्यात सुरू करण्यापूर्वी करावी लागणारी तयारी याविषयी मार्गदर्शन केले जाईल. निर्यात विपणन योजना तयार करणे, पेमेंट टर्म्स, इन्कोटर्म्स, कागदपत्रे आणि परदेशी ग्राहकांशी व्यावसायिक वाटाघाटी करण्याची कौशल्ये यांचाही समावेश असेल. याशिवाय उत्पादनांचे व्यवस्थापन, पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड आणि शासनाच्या निर्यात योजनांची माहिती दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील बदलत्या परिस्थितीचा व्यवसायासाठी उपयोग कसा करून घ्यावा, यावरही प्रशिक्षणात भर असेल. आयात-निर्यात क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणारे नवउद्योजक, व्यापारी तसेच आपल्या व्यवसायाचा विस्तार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करू पाहणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

‘लिटल फिल्ममेकर’ कार्यशाळा
चित्रपट पाहण्याबरोबरच स्वतःची गोष्ट लिहिणे, त्यात अभिनय करणे आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून ती पडद्यावर साकारण्याची संधी आता मुलांना मिळणार आहे. ९ ते १३ वयोगटातील मुलांसाठी दोनदिवसीय ‘लिटल फिल्ममेकर’ ही प्रत्यक्ष सहभागावर आधारित कार्यशाळा १३ व १४ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि सांघिक कामाला प्रोत्साहन देत मुलांना चित्रपट निर्मितीची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेत चित्रपट कसा तयार होतो, कथा कशी सुचवावी, पात्रांची निर्मिती, संवादलेखन आणि स्टोरीबोर्ड तयार करणे यापासून प्रशिक्षणाची सुरुवात होईल. त्यानंतर अभिनय, दिग्दर्शन, कॅमेरा हाताळणी, दृश्यांचे चित्रीकरण, ध्वनिमुद्रण आणि एडिटिंग या प्रक्रियांचा अनुभव मुलांना घेता येईल. प्रत्येक मुलाला चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT