मुंबई

आयात-निर्यात व्यवसाय कार्यशाळेचे शनिवारी आयोजन

CD

पुणे, ता. १२ : जागतिकीकरणामुळे भारतीय उत्पादने जगभरातील बाजारपेठेत पोहोचविण्याच्या संधी वाढल्या असून, योग्य नियोजन आणि व्यावसायिक धोरणांच्या आधारे आयात-निर्यात व्यवसाय सुरू करता येतो. या पार्श्वभूमीवर सात दिवसांची ‘आयात-निर्यात व्यवसाय’ कार्यशाळा १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यात आयात-निर्यात धोरण, नोंदणी व परवाने, आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक अटी, शिपिंग व कंटेनर व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, दररचना, पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच परदेशी ग्राहक व पुरवठादार शोधणे, बाजारपेठेचा अभ्यास, उत्पादनाची निवड, आंतरराष्ट्रीय वाटाघाटी, व्यवहारातील जोखीम व्यवस्थापन, कागदपत्रे, पेमेंट पद्धती, बँकिंग, कस्टम्स व शिपिंग प्रक्रियेची माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

यूट्युब कंटेंट क्रिएटर होण्याची संधी
‘यूट्युब कंटेंट क्रिएटर विथ एआय’ ही चार दिवसांची कार्यशाळा १४, १५ आणि २१, २२ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. ज्यांना यूट्युब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत यूट्युबद्वारे कमाई कशी करता येते याबद्दल संपूर्ण माहिती, स्वत:चे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये एआयची भूमिका व कोणती एआय साधने वापरावीत, याचे मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

स्क्रिप्ट रायटिंग, स्क्रीनप्ले रायटिंग कार्यशाळा
चित्रपटासाठी कल्पनेचे प्रभावी कथेत आणि कथेचे पटकथेत रूपांतर करण्याचे तंत्र शिकवणारी ‘स्क्रिप्ट रायटिंग आणि स्क्रीनप्ले रायटिंग’ ही तीनदिवसीय विशेष कार्यशाळा १६, १७ व १८ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. यात चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया, आशयनिर्मिती, कथेचा विकास, सिनेमॅटिक दृश्यभाषा, स्क्रीनप्लेची रचना, प्रसंगांची मांडणी, व्यक्तिरेखांची जडणघडण आणि थ्री-ॲक्ट स्ट्रक्चर यांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिके आणि असाइनमेंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष पटकथा लेखनाचा सराव करून घेतला जाईल. त्यामुळे सहभागींना शिकलेल्या संकल्पनांचा लेखनात वापर करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी, शॉर्ट फिल्म निर्माते, सहाय्यक दिग्दर्शक तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Unknown UTI Symptoms: लघवी करताना जळजळ होत नाही, तरीही असू शकते UTI! शरीरातील 'हे' ६ बदल वेळीच ओळखा

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT