जाणून घ्या शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी
शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना इ. शेतजमीन विषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा इ. याविषयी माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी (ता. २७) आयोजिली आहे. यात तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाइन कसे मिळवावे, विविध ऑनलाइन उपलब्ध साधने कशी वापरावी इ.बद्दल रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. आपण जमीन मालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट असाल, तर कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे.
रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन प्रशिक्षण
रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करण्याच्या क्षेत्रात यायचा विचार करत असणाऱ्यांसाठी किंवा या क्षेत्रात काम करत आहे; परंतु सुयोग्य पद्धत माहीत नाही अशांसाठी उपयुक्त असे प्रशिक्षण तुमच्यासाठी तुमचे कौशल्य विकसित करायला मदत करणार आहे. हे प्रशिक्षण सोमवार (ता. २९)पासून आयोजिले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करून रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. सिव्हिल इंजिनिअर्स, आर्किटेक्टस व विद्यार्थी यांच्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे.
व्यावसायिकांसाठी
वास्तुशास्त्र कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, कार्यालय किंवा व्यावसायिक जागेचे नियोजन कसे असावे, याबाबत मार्गदर्शन करणारी वास्तुशास्त्र कार्यशाळा १ जुलै रोजी आयोजिली आहे. आज अनेक ग्राहक घर किंवा व्यावसायिक जागा खरेदी करताना वास्तुशास्त्राचा विचार करतात. त्यामुळे रिअल इस्टेट एजंटांना वास्तुशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असल्यास ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करता येते, त्यांच्या शंकांचे निरसन करता येते आणि विक्री प्रक्रियेत अधिक विश्वास निर्माण करता येतो. या दृष्टीने ही कार्यशाळा रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र म्हणजे काय, वास्तुदोषांचे प्रकार, दिशा व उपदिशांचे महत्त्व, पंचतत्त्वांचा प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण
आजच्या डिजिटल युगात बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक झाली आहे. अशा वेळी बीपीएमएस व पीआरईडीसीआर प्रणाली समजून घेणे हे वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते व नगर नियोजकांसाठी अत्यावश्यक झाले आहे. ६ जुलैपासून सुरू होणारे बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण हे व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे. केवळ एका महिन्यात यूडीसीपीआर नियोजन नियम, बिल्डिंग परमिशन प्रक्रिया, योग्य ड्रॉइंग सबमिशनसाठी स्किल्स आणि पीआरईडीसीआर टेस्टिंग यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यांसाठी व्हाॅट्सॲप साहाय्य, रेकॉर्ड केलेल्या सत्रांना आजीवन प्रवेश, टीपी क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७. क्यूआर कोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.