पुणे, ता. २३ : रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि सिव्हिल क्षेत्रातील वाढत्या करिअर व व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन करणारी विशेष ऑनलाइन कार्यशाळा साेमवारी (ता. २९) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे. एसआयआयएलसी (सिमासेस लर्निंग एलएलपी) यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील सध्याच्या अपेक्षा, आवश्यक कौशल्ये आणि भविष्यातील रोजगार संधींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
देशातील स्मार्ट सिटी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि व्यावसायिक विकास प्रकल्पांमुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होत आहेत. मात्र उद्योगांना अपेक्षित कौशल्ये आणि उपलब्ध मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वेबिनारमध्ये बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली, मालमत्ता मूल्यमापन, हरित इमारत संकल्पना तसेच उद्योग क्षेत्रातील भरती प्रक्रियेत अपेक्षित कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर क्षेत्रातील विद्यार्थी, १०वी उत्तीर्ण युवक-युवती, पदवीधर तसेच १८ ते ५५ वयोगटातील करिअरविषयक संधी शोधणाऱ्या व्यक्तींसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
या सत्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्ट्रक्चरल ऑडिटर आणि तज्ज्ञ इंजिनिअर सुशांत करंबळी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून सहभागींना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नव्या संधींबाबत माहिती मिळणार आहे. तसेच रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि सिव्हिल क्षेत्राशी संबंधित विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची माहितीही देण्यात येणार आहे.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७. क्यूआर कोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.