मुंबई

जीएसटी अकाउंट असिस्टंट, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन प्रशिक्षण

CD

पुणे, ता. ४ : ‘सकाळ’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी आणि ईशान्य फाउंडेशनतर्फे १८ ते ३५ वयोगटांतील तरुण-तरुणींसाठी जीएसटी अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयांचे विनामूल्य प्रशिक्षण १० ऑक्टोबरपासून आयोजित केले आहे. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’ या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इ. विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र व नोकरीसाठी साहाय्य पुरवले जाईल. इच्छुकांनी चाळ नंबर ८८/४, डांबर कोठी, पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे या प्रशिक्षणाच्या ठिकाणी भेट द्यावी.
संपर्क : ८६६८७६२२४०, ९०४९५४२७२५

एक्सेल, एआयच्या मदतीने
डेटा ॲनालिसिस कार्यशाळा

व्यवसायातील निर्णय अधिक अचूक आणि परिणामकारक घेण्यासाठी डेटा विश्लेषणाचे कौशल्य विकसित करणारी प्रात्यक्षिक कार्यशाळा १० व ११ ऑक्टोबरला आयोजित केली आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि एआयच्या सहाय्याने डेटा स्वच्छ करणे, त्याचे विश्लेषण करणे, आलेख व अहवाल तयार करणे आणि त्यातून उपयुक्त निष्कर्ष काढण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यशाळेत डेटा अ‍ॅनालिसिसची मूलभूत माहिती, डेटा क्लीनिंग, एक्सेलमधील महत्त्वाची सूत्रे व फंक्शन्स, सॉर्टिंग, फिल्टरिंग, फॉरमॅटिंग तसेच पिव्होट टेबल्स व पिव्होट चार्टस्‌द्वारे मोठ्या डेटाचे विश्लेषण करण्याचे तंत्र शिकवले जाईल. याशिवाय चार्टस्‌, डॅशबोर्ड व डेटा व्हिज्युअलायझेशन तयार करणे, एआयचा प्रभावी वापर आणि व्यावसायिक उदाहरणांवर आधारित सराव घेतला जाणार आहे. व्यावसायिक, व्यवस्थापक, उद्योजक, विद्यार्थी आणि व्यवसाय मालकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

स्वीय सहाय्यक प्रशिक्षण
लोकप्रतिनिधींचा स्वीय सहाय्यक म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण १० व ११ ऑक्टोबरला आयोजित केले आहे. प्रशिक्षणात स्वीय सहाय्यकाचे महत्त्व, संधी व आव्हाने, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, विधानमंडळाच्या कामकाजाची माहिती, मतदारसंघाचा अभ्यास व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय सोशल मीडियाचा वापर, शासन व प्रशासनाशी संपर्क व समन्वय, शासकीय व अशासकीय योजनांची माहिती, वेळेचे नियोजन तसेच लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांचा आढावा घेतला जाईल. हे प्रशिक्षण पदवीधर उमेदवार, एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, राजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तसेच सार्वजनिक प्रशासनात रस असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT