मुंबई

व्यावसायिक आवळा प्रक्रिया कार्यशाळा

CD

पुणे, ता. ५ : आवळ्याचे पोषणमूल्य आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन १० ऑक्टोबरला व्यावसायिक आवळा प्रक्रिया कार्यशाळा घेण्यात येणार आहे. आवळा प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणारे उद्योजक, महिला, बचत गट आणि अन्नप्रक्रिया व्यवसायात रस असणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणात आवळा कॅन्डी, पेरी पेरी व पाचक कॅन्डी, जॅगरी कॅन्डी, आवळ्याचा रस, लोणचे, च्यवनप्राश, आवळा पावडर, तेल, सुपारी, पाक, चुंदा, गुलकंद आणि जाम यांसारखी उत्पादने तयार करण्याच्या पद्धती शिकवल्या जाणार आहेत. तसेच टिकवणक्षमता, पॅकिंग, लेबलिंग, कॉस्टिंग, बाजारपेठ व विक्री नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाईल. मशिनरी, प्रकल्प उभारणी आणि शासकीय अनुदान व योजनांची माहितीही देण्यात येणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

हाउसकीपिंग व्यवसाय प्रशिक्षण
हाउसकीपिंग सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यावसायिक सेवा व स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी १० व ११ ऑक्टोबरला हाउसकीपिंग व्यवसाय प्रशिक्षण आयोजिले आहे. या प्रशिक्षणामध्ये हाउसकीपिंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, प्रत्यक्ष कामाचे तंत्र आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कौशल्यांचे सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. हाउसकीपिंग क्षेत्राची ओळख, वापरली जाणारी साधने व उपकरणे यासोबतच सॉफ्ट स्किल्स, ग्राहक संवाद यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच हाउसकीपिंग व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, निविदा प्रक्रिया, दरपत्रक व प्रस्ताव तयार करण्याची पद्धत, मार्केटिंग व ग्राहक मिळविण्याचे मार्ग समजावून सांगितले जातील. गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक टिकवून ठेवण्याची तंत्रे आणि व्यवसाय वाढ व कमाईचा आराखडा यावरही मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

प्रॉपर्टी व्हॅल्युएशन फॉर रिअल इस्टेट
बँक कर्जे, प्रकल्प वित्तपुरवठा, विमा, न्यायालयीन प्रकरणे, आयकर तसेच मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी अचूक मालमत्ता मूल्यांकनाची गरज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थावर संपदा मालमत्ता मूल्यांकन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी १२ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात जमीन व इमारतींचे मूल्यांकन, बाजारमूल्य निश्चितीच्या पद्धती, रेडीरेकनरचा वापर, घसारा, बांधकाम खर्चाचे विश्लेषण, प्रत्यक्ष मालमत्ता पाहणी, मूल्यांकन अहवाल तयार करणे तसेच बँका व वित्तीय संस्थांच्या निकषांविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षण दोन आठवडे ऑनलाइन आणि एक दिवस प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अशा स्वरूपात होईल. स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद, पदवीधर आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांना रोजगारासह स्वतंत्र मूल्यांकन सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठीही हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

‘लीव्ह अँड लायसन्स’ मास्टरक्लास
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. मात्र, योग्य करारनामा तयार करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया; तसेच पोलिसांना कळवणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याचसाठी याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास २१ ऑक्टोबरला आयोजिला आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ते ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाणार आहे. तसेच, ११ महिन्यांच्या कराराची नोंदणी बंधनकारक का आहे, कोणती कागदपत्रे लागतात, पोलिस इंटिमेशनचे महत्त्व आणि सरकारमान्य स्वरूपांचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT