मुंबई

पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा

CD

पुणे, ता. ६ : पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी, तसेच विद्यमान टेक्निशियन व फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तीनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा २५, २६ व २७ सप्टेंबरला आयोजित केली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, आवश्यक उपकरणांची माहिती तसेच शासन नियमांबाबत मार्गदर्शन मिळेल. यासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, निविदा प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार, तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

जमीन गुंतवणूक
व्यवसायाबाबत मार्गदर्शन

जमिनीचे भाव हे सर्वत्र आणि सतत वाढत असल्याने म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर्स यांसारख्या गुंतवणुकीपेक्षा जमिनीतील गुंतवणूक जास्त फायद्याची ठरते. गुंतवणूक पर्याय म्हणून जमिनीकडे कसे बघावे व त्यातून पैसा कसा उभारावा, यासंदर्भात मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २७ सप्टेंबरला आयोजित केली आहे. कार्यशाळेत जमिनीची मूलभूत माहिती : प्रकार, क्षेत्र आणि दस्तऐवजीकरण, स्पर्धक विश्लेषण आणि बाजार संशोधन, जमीन शोधणे व त्याचे नियोजन, बँकिंग आणि वित्त (निधी), विकास आणि विपणन, मालमत्ता व्यवस्थापन आदी विषयांवर रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोट्स दिल्या जातील आणि १०० टक्के व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४

रिअल इस्टेट मेंटॉरशिप प्रोग्रॅम

ज्या लोकांना रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य प्राप्त करायचे आहे, ज्यांना अतिशय श्रीमंत जीवनशैली जगण्याची इच्छा व स्थिर व्यवसाय हवा आहे, अशांसाठी तीन महिन्यांचा रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘महारेरा’ची अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’तर्फे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत. करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श असे हे प्रशिक्षण असणार आहे. रिअल इस्टेट मास्टर ट्रेनर व या क्षेत्रातील अनेक प्रकाशित पुस्तकांचे तज्ज्ञ लेखक रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. प्रशिक्षणाचे प्रतिव्यक्ती शुल्क ५० हजार रुपये अधिक जीएसटी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT