‘गो गॅस’ एलपीजीचा विस्तार अधिक वेगाने
पुणे, ता. ८ : कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडच्या ‘गो गॅस’ या एलपीजी ब्रँडची महाराष्ट्रातील सक्षम वितरण यंत्रणेमुळे विस्तार अधिक वेगाने होत असून, राज्यात कंपनीचे स्वतःचे १३ एलपीजी बॉटलिंग प्लांट्स कार्यरत आहेत. विविध केंद्रांमधून ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा केला जात आहे. तारापूर, वाडा, कराड, खोपोली, कोल्हापूर, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक, वाळूज, सासवड आणि वसई येथून पुरवठा करण्यात येत आहे.
कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा म्हणाले, “महाराष्ट्रातील बॉटलिंग प्लांट्सची व्यापक वितरण व्यवस्था गो गॅसच्या राष्ट्रीय विस्ताराचा महत्त्वाचा आधार आहे. या पायाभूत सुविधांमुळे जलद वितरण, एलपीजीची उपलब्धता आणि ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देणे शक्य होत आहे.” गो गॅसच्या विस्तारामुळे वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि अन्य सहाय्यक सेवांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. तसेच इच्छुक उद्योजकांना गो गॅस डीलरशिपच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च सुरक्षा मानकांनी सुसज्ज असलेल्या प्लांट्समुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना एलपीजीचा नियमित पुरवठा करण्यास मदत होत आहे. कंपनी सध्या देशातील २५ राज्यांमध्ये कार्यरत असून, २,५००हून अधिक डीलर्सचे नेटवर्क असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी गो गॅसच्या www.gogas.co या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा १८०० २१०७ ९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.