मुंबई

शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी अन् महसूल

CD

पुणे, ता. १५ : शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना इ. शेतजमीनविषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्यांचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा इ. विषयी माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा २६ सप्टेंबरला आयोजित केली आहे. यात तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाइन कसे मिळवावे, विविध ऑनलाइन उपलब्ध साधने कशी वापरावी याबद्दल रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. आपण जमीन मालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट असाल तर कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी; तसेच विद्यमान टेक्निशियन व फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तीन वसीय प्रशिक्षण कार्यशाळा २५, २६ व २७ सप्टेंबरला आयोजित केली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, उपकरणांची माहिती; तसेच सरकारच्या नियमांबाबत मार्गदर्शन मिळेल. यासह प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, निविदा प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार, तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

रिअल इस्टेट मेंटॉरशिप प्रोग्रॅम
ज्या लोकांना रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य प्राप्त करायचे आहे, ज्यांना अतिशय श्रीमंत जीवनशैली जगण्याची इच्छा व स्थिर व्यवसाय हवा आहे, अशांसाठी तीन महिन्यांचा रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘महारेरा’ची अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’तर्फे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत. करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी हे प्रशिक्षण एक आदर्श असणार आहे. रिअल इस्टेट मास्टर ट्रेनर व या क्षेत्रातील अनेक प्रकाशित पुस्तकांचे तज्ज्ञ लेखक रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. प्रशिक्षणाचे प्रतिव्यक्ती शुल्क ५० हजार रुपये अधिक जीएसटी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT