एसआयआयएलसी
कौशल्य विकास विशेष प्रशिक्षण
पुणे, ता. ३१ : लोकप्रतिनिधींचा स्वीय सहाय्यक म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण ४ व ५ एप्रिलला आयोजिले आहे. यात स्वीय सहाय्यकाचे महत्त्व, संधी व आव्हाने, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, विधान मंडळाच्या कामकाजाची माहिती, मतदारसंघाचा अभ्यास व व्यवस्थापनावर मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय सोशल मीडियाचा वापर, शासन व प्रशासनाशी संपर्क व समन्वय, योजनांची माहिती, वेळेचे नियोजन तसेच लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांचा सखोल आढावा घेतला जाईल. हे प्रशिक्षण पदवीधर उमेदवार, एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, राजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तसेच सार्वजनिक प्रशासनात रस असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
अन्न सेवा उद्योगाविषयी कार्यशाळा
अन्न सेवा उद्योगात व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक, हॉटेल व रेस्टॉरंट मालक तसेच नवउद्योजकांसाठी विशेष कार्यशाळा ५ एप्रिलला आयोजिली आहे. यात हॉटेल, कॅफे, क्लाऊड किचन आणि ढाबा व्यवसायाचे नियोजन, ब्रँडिंग, कर्मचारी व्यवस्थापन तसेच किचन व फ्लोअर ऑपरेशन्स, तंत्रज्ञानाचा वाढता वापर व खर्चाच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन होणार आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करताना २१ महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती, क्लाऊड किचनची संकल्पना तसेच स्विगी व झोमॅटोसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती, कमिशन संरचना, फूड स्टॉल्स, ढाबा व कॅफेद्वारे प्रभावी व्यवसाय उभारण्याचे तंत्र, स्टाफिंग, किचन लेआउट, पीओएस प्रणाली, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि वित्तीय नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशनने १७, १८ व १९ एप्रिलला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.