मुंबई

सकाळ कनेक्ट

CD

अन्न सेवा उद्योगावरील मार्गदर्शन कार्यशाळा
पुणे, ता. ३ : अन्न सेवा (फूड सर्व्हिस) उद्योगात व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक, हॉटेल व रेस्टॉरंट मालक तसेच नवउद्योजकांसाठी विशेष कार्यशाळा ५ एप्रिलला आयोजिली आहे. कार्यशाळेत हॉटेल, कॅफे, क्लाऊड किचन आणि ढाबा व्यवसायाचे नियोजन, ब्रँडिंग, कर्मचारी व्यवस्थापन तसेच किचन व फ्लोअर ऑपरेशन्स, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, खर्चाचे नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करताना आवश्यक असलेल्या २१ महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती, क्लाऊड किचनची संकल्पना, तसेच स्विगी व झोमॅटो यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती, कमिशन संरचना, फूड स्टॉल्स, ढाबा व कॅफेद्वारे स्थानिक पातळीवर प्रभावी व्यवसाय उभारण्याचे तंत्र, स्टाफिंग, किचन लेआउट, पीओएस प्रणाली, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि वित्तीय नियोजन याबाबतही मार्गदर्शन करण्यात येईल.
-----------------------------------------------------
प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी
प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी हा एक विशेष प्रकार आहे. सध्या कॅमेऱ्यातूनही प्रॉडक्ट्सचे वेगळेपण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून अधिक उठावदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचते. याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण ५ एप्रिलला आयोजिले आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचे प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती मिळेल. हे प्रशिक्षण नवीन लोकांसाठी तसेच इतर कोणत्याही व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायाला प्रोफेशनल लूक देण्यासाठी, ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
---------------------------------------------------
बांधकाम व्यवसाय व्यवस्थापन
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर ३० दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण १३ एप्रिलपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साईटवर त्याचा सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
-----------------------------------------------------
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT