एसआयआयएलसी
साउथ इंडियन रेस्टॉरंट व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
पुणे, ता. ७ : साउथ इंडियन खाद्यपदार्थांना वाढती मागणी आणि या क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन या विषयावर मार्गदर्शन करणारी व्यावसायिक कार्यशाळा शनिवार (ता. ९) व रविवारी (ता. १०) आयोजिली आहे. यात साधी, तट्टे, पुडी व फ्राइड इडली; साधा, पेपर, दावणगिरी लोणी स्पंज, स्प्रिंग, चीज, म्हैसूर मसाला, घी, रागी डोसा; मेदुवडा, लेमन राईस, कर्ड राईस, मैसूर बोंडा यांसह विविध प्रकार शिकवले जाणार आहेत. तसेच साउथ इंडियन सांबर, सांबर मसाला, ओनियन उत्तप्पा, कोकोनट चटणी आणि चटण्यांचे प्रकार प्रात्यक्षिकांद्वारे समजावले जाईल. याशिवाय साउथ इंडियन व्यवसायातून स्टार्टअप कसा सुरू करावा, शासकीय योजना, नफा नियोजन आणि फ्रँचायझी मॉडेल विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे.
पॅकेजिंग तंत्रज्ञान उद्योग कार्यशाळा
प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, शेतमाल असो वा दूध किंवा पाणी अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची पॅकिंग करण्यासाठी पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लॅस्टिक इ. विविध प्रकारचे पॅकेजिंग मटेरिअल लागते. हे मटेरिअल कसे तयार करतात, कोणती यंत्रे लागतात, भांडवल इ.विषयी माहिती करून देणारा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शनिवार (ता. ९) पासून सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, विविध प्रकारच्या मटेरिअलची ओळख, यंत्रे, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप करायचे आहे, तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून, त्यांना यातील तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे अशांसाठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश महारेराने दिला आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच सोमवार (ता. ११) पासून सुरू होत आहे.
संपर्क : ७३५०००१६०२, ७३५०००१६०३, ८९५६३४४४७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.